जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत पाकिस्तान भारताच्या पुढे; 'हा' देश पहिल्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:01 IST2025-04-01T15:59:14+5:302025-04-01T16:01:49+5:30

जगातील सर्वात सुरक्षित देशांची यादी समोर आली असून त्यामध्ये पाकिस्तानने भारताला मागे टाकलं आहे.

Safest countries in the world has emerged Pakistan has surpassed India | जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत पाकिस्तान भारताच्या पुढे; 'हा' देश पहिल्या क्रमांकावर

जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत पाकिस्तान भारताच्या पुढे; 'हा' देश पहिल्या क्रमांकावर

World’s Safest Country: जगातील सर्वात सुरक्षित देशांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काही आश्चर्यकारक आकडेवारीही समोर आली आहेत. यादीत अमेरिका, ब्रिटन किंवा कोणताही युरोपीय देश सर्वात पुढे नसल्याचे समोर आलं. त्याऐवजी दक्षिण-पश्चिम युरोपमधील एक छोटासा देश यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानाने सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत भारताला मागे टाकलं आहे. तर अमेरिका देखील या यादीत खालच्या स्थानी आहे.

नुम्बेओ सेफ्टी इंडेक्सनुसार,२०२५ च्या ग्लोबल सेफ्टी इंडेक्सने जगातील सर्वात सुरक्षित देशांची नवीन यादी जाहीर केली आहे. पाकिस्ताननेभारताला मागे टाकून चांगले स्थान मिळवले आहे, तर अमेरिका, ब्रिटन आणि चीन सारख्या मोठ्या देशांना तुलनेने खालचे स्थान मिळाले आहे. या यादीत पाकिस्तान ६५व्या तर भारत ६६व्या क्रमांकावर आहे. सुरक्षेच्या बाबतीत पाकिस्तानने आता भारताला मागे टाकल्याने ही यादी दोन्ही देशांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, अमेरिका या यादीत ८९ व्या क्रमांकावर आहे. अमेरिका आशियातील दोन्ही देशांपेक्षा खालच्या स्थानी आहे.

या यादीत सर्वात सुरक्षित देश म्हणून अँडोराने ८४.७ गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती ८४.५ गुण, कतार ८४.२ गुणांसह तिसरा, तैवानचा ८२.९ गुणांसह चौथा आणि ओमानचा ८१.७ गुणांसह पाचवा क्रमांक लागतो. मजबूत सुरक्षा व्यवस्था, गुन्हेगारीचा कमी दर आणि उत्तम राहणीमान यामुळे अँडोरा हा देश या क्रमवारीत अव्वल आहे.

अँडोरा हे खेडं असले तरी तो एक स्वतंत्र देश आहे. फ्रान्स आणि स्पेन यांच्यामध्ये या देशाचे स्थान आहे. अँडोराच्या एका बाजूनं फ्रान्स आणि तीन बाजूंनी स्पेन आहे. अँडोरा जगातील ११ वा सर्वात लहान देश आहे. येथील लोकसंख्या कमी असल्याने इथे रेल्वेचे जाळेही नाही. त्यामुळे नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी फ्रान्सला जावे लागते.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या क्रमवारीत फक्त एका गुणाचा फरक आहे, पण ही दोन्ही देशांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. भारताला आपली सुरक्षा व्यवस्था सुधारण्याच्या दिशेने पावले उचलावी लागतील जेणेकरून भविष्यात या क्रमवारीत अधिक चांगल्या स्थानावर येऊ शकेल.
 

Web Title: Safest countries in the world has emerged Pakistan has surpassed India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.