डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; आधी डोवाल गेले, आता जयशंकर रशियाला जाणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:20 IST2025-08-13T18:20:18+5:302025-08-13T18:20:40+5:30

S Jaishankar Russia Visit: भारत आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा दौरा महत्वाचा मानला जातोय.

S Jaishankar Russia Visit: Preparations to shock Donald Trump; First Doval went, now Jaishankar will go to Russia | डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; आधी डोवाल गेले, आता जयशंकर रशियाला जाणार...

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; आधी डोवाल गेले, आता जयशंकर रशियाला जाणार...

S Jaishankar Russia Visit: अमेरिकेने ५० टक्के कर लादल्यानंतर भारत आणि रशिया एकमेकांच्या जवळ आले आहेत. अलिकडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी रशियाचा दौरा केला आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकरदेखील रशियाला भेट देणार आहेत. तिथे ते रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील.

रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियात पुतिन यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता जयशंकर रशिया दौऱ्यावर जात आहेत. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, एस जयशंकर २१ ऑगस्ट २०२५ रोजी मॉस्कोमध्ये सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील.

डोवाल यांच्या भेटीत या मुद्द्यांवर चर्चा 
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) क्रेमलिनमध्ये अजित डोवाल यांची भेट घेतली. या बैठकीत सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु आणि राष्ट्रपतींचे सहाय्यक युरी उशाकोव्ह यांच्यासह वरिष्ठ रशियन अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि आगामी नेतृत्वस्तरीय बैठकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

ट्रम्प-पुतिन बैठक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवारी (१५ ऑगस्ट २०२५) भेट होणार आहे. हे दोन्ही नेते अलास्कामध्ये भेटणार आहेत. हा एकेकाळी रशियाचा भाग होता. रशियन तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर कर लादला आहे. शिवाय, रशियावरही अनेक प्रकारचे निर्बंध लावले आहेत. अशा परिस्थितीत, या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: S Jaishankar Russia Visit: Preparations to shock Donald Trump; First Doval went, now Jaishankar will go to Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.