शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:21 IST

दरम्यान, आण्विक सामर्थ्याच्या बाबतीत अमेरिका सर्वांत पुढे आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण मंत्रालयाला नुकताच आण्ववस्त्र टेस्टिंगचा आदेश दिला आहे. यानंतर, रशियाकडूनही तत्काळ प्रतिक्रिया आली आहे. अमेरिका कोणते पाऊल उचलते यावर रशिया आपली पुढील भूमिका ठरवेल, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.

पेस्कोव्ह म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात, काही देश आण्वस्त्रांची चाचणी घेत असल्याचे म्हटले आहे. मात्र आमच्याकडे अद्याप अशी कोणतीही माहिती नाही. जर हे विधान ब्यूरवेस्टिनक चाचणीसंदर्भात असेल, तर ही कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र चाचणी नाही. 

..आम्ही परिस्थितीनुसार पाऊल उचलू -पेस्कोव्ह म्हणाले, सर्वच देश आपापली सुरक्षा प्रणाली विकसित करत आहेत. मात्र त्या आण्वस्त्र चाचण्या नाहीत. अमेरिका येक सार्वभौम देश असल्याने त्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र मी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विधानाची आठवण करून देतो, "जर अमेरिकेने आण्वस्त्र चाचणीवरील बंदी हटवली, तर आम्ही परिस्थितीनुसार पाऊल उचलू.”

रशियाने २६ ऑक्टोबर रोजी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत अमेरिकेने अण्वस्त्रांच्या चाचणीला मंजुरी दिली. याचवेळी, आण्विक सामर्थ्याच्या बाबतीत अमेरिका सर्वांत पुढे आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

कुणाकडे जास्त अण्वस्त्र? -आईएएनएसनुसार, ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स’ने ९ देशांकडील अण्वस्त्रांची संख्य जाहीर केली आहे. यानुसार, २०२५ पर्यंत रशियाकडे ५,४४९ अण्वस्तर तर नाटो देशांकडे एकूण ५,७९२ अण्वस्तर आहेत. यांत एकट्या अमेरिकेकडे ५,२७७ एवढी अण्वस्त्र आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia Warns US After Trump Orders Nuclear Test Readiness

Web Summary : Tensions rise as Trump orders nuclear test readiness, prompting immediate Russian reaction. Russia will decide its next move based on US actions. Russia warns that if the US resumes nuclear testing, it will respond accordingly, highlighting growing global nuclear concerns.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिकाrussiaरशिया