Russia Ukraine War : आता रशियाचा NATO देशांना झटका, पुतिन असा घेतायत बदला! 'हे' 2 देश सर्वात पहिले निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:06 AM2022-04-27T11:06:56+5:302022-04-27T11:08:28+5:30

पुतिन यांनी गेल्या महिन्यातच, रशियाकडून गॅस आणि तेल खरेदी करणाऱ्या देशांना रशियन चलन रुबलमध्ये व्यवहार करावा, अशी विनंती केली होती. पण...

Russia Ukraine war Putin suspend natural gas supply to bulgaria and poland | Russia Ukraine War : आता रशियाचा NATO देशांना झटका, पुतिन असा घेतायत बदला! 'हे' 2 देश सर्वात पहिले निशाण्यावर

Russia Ukraine War : आता रशियाचा NATO देशांना झटका, पुतिन असा घेतायत बदला! 'हे' 2 देश सर्वात पहिले निशाण्यावर

Next

रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनची उघडपणे मदत करणे आणि रशियाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करणे, युरोपातील काही देशांना महागात पडताना दिसत आहे. कारण रशियाने कठोर पावले उचलत पोलंड आणि बल्गेरियाचा गॅस-तेल पुरवठा बंद केला आहे.

पुतिन यांनी गेल्या महिन्यातच, रशियाकडून गॅस आणि तेल खरेदी करणाऱ्या देशांना रशियन चलन रुबलमध्ये व्यवहार करावा, अशी विनंती केली होती. मात्र, युरोपियन देशांनी पुतीन यांची ही विनंती मान्य करण्यास नकार दिला. यानंतर आता पुतिन यांनी, अशा प्रकारची कारवाई करत पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपण गॅस सप्लाय थांबवत आहोत, असे रशियन ऊर्जा कंपनी गजप्रोमने (Gazprom) आपल्याला सागितल्याचे, पोलंड आणि बल्गेरिया यांनी म्हटले आहे. पोलंडमधील गॅस कंपनी पीजीएनआयजीने म्हटले आहे, की रशियाने यमल-युरोप पाइपलाइनने होणारी गॅसची डिलिव्हरी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, बल्गेरियाच्या ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे, की रशिया तुर्कस्ट्रिम पाइपलाइनच्या माध्यमाने बल्गारियाला होणारा गॅस पुरवठा देखील बंद करत आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासूनच पोलंड उघडपणे युक्रेनला पाठिंबा देत आहे. पोलंडने युक्रेनला युद्धासाठी अनेक शस्त्रेही पुरविली आहेत. एवढेच नाही, तर आपण युक्रेनला टँक देखील पाठवत आहोत, असेही पोलंड सरकारने नुकतेच म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, रशियातून युरोपात जाणारा नॅच्युरल गॅस, घरातील वातावरण गरम करण्यासाठी, वीज निर्मितीसाठी आणि इंधन म्हणूनही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. 

Web Title: Russia Ukraine war Putin suspend natural gas supply to bulgaria and poland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.