शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पाडला बांगलादेशचा बुक्का! ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
4
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
5
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
6
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
7
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
8
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
9
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
10
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
11
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
12
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
13
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
14
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
15
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
16
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
17
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
18
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
19
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
20
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."

Coronavirus : महासंकटाचा सामना करण्यासाठी रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 14:50 IST

जुलै महिन्यापर्यंत रशिया भारताला स्पुटनिक व्ही लसीचे एक कोटी डोस पाठवणार. भारतासाठी अनेक देशांनी पुढे केला मदतीचा हात.

ठळक मुद्देजुलै महिन्यापर्यंत रशिया भारताला स्पुटनिक व्ही लसीचे एक कोटी डोस पाठवणार.भारतासाठी अनेक देशांनी पुढे केला मदतीचा हात.

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. दरम्यान, अनेक देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, यापूर्वी भारताचा जुना मित्र समजल्या जाणाऱ्या रशियानंही भारताला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. तसंच Sputnik-V या लसीचे काही डोस पाठवले होते. आता पुन्हा एकदा रशिया पुढील दोन दिवसांमध्ये Sputnik-V या लसीच्या दीड लाख डोसची दुसरी खेप पाठवणार आहे. याव्यतिरिक्त मे महिन्याच्या अखेरिस हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबमध्ये तीस लाख डोस येणार आहे. सध्या जून महिन्यापर्यंत ५० लाथ आणि जुलै महिन्यापर्यंत Sputnik-V चे एक कोटी डोस भारतात पाठवण्याची तयारी रशियाकडून सुरू आहे.नवी दिल्ली आणि मॉस्को येथील काही अधिकाऱ्यांनुसार रशिया कमीतकमी चार ऑक्सिजन उत्पादन करणारे ट्रक दिल्लीला पाठवत आहे. वीजेचा पुरवठा झाल्यानंतर २०० बेड्सच्या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करू शकतो. "आम्ही यापूर्वीच चार ट्रकची खरेदी केली आहे आणि अधिक मिळवण्याचे प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. हे ट्रक रशियाच्या IL-76 या विमानानं या आठवड्यात भारतात पोहोचतील," असंही त्यांनी सांगितलं.Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस अधिक प्रभावी?; जाणून घ्या माहिती१ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. या दिवशीच Sputnik-V या लसीच्या दीड लाख डोसची पहिली खेप भारतात आली होती. ही लस ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. १२ एप्रिल रोजी भारतात आपात्कालिन वापरासाठी या लसीला मंजुरी देण्यात आली होती. रशियानं दिल्लीच्या कलावती रुग्णालयाला ७५ व्हेंटिलेटर्स, २० मोठ्या क्षमतेचे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स आणि मध्ये दिल्लीच्या रुग्णालासाठी १५० बेड्सचा मॉनिटर पाठवला होता. यापूर्वी खासगी निधीतून ६० मोठ्या ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्सशिवाय रशियानं उत्तर भारतातील एम्समध्ये कोरोना विषाणूच्या सुरूवातीच्या टप्प्यात उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या २ लाख गोळ्याही पुरवल्या होत्या. तसंच सध्या रशिया रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासही उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतrussiaरशियाOxygen Cylinderऑक्सिजनremdesivirरेमडेसिवीर