शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचा धक्कादायक निर्णय! १ एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबविणार; भारतावर कसा, किती होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:22 IST

Russia Petrol Export Ban: रशियाचा मोठा निर्णय: १ एप्रिल २०२६ पासून पेट्रोल निर्यातीवर बंदी. देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी पुतिन सरकारचे पाऊल.

रशिया-युक्रेन युद्धाच्या चौथ्या वर्षी आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशांतर्गत इंधन पुरवठा सुरक्षित करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. रशियाने १ एप्रिल २०२६ पासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत किमती स्थिर ठेवणे आणि पुरवठा सुरळीत ठेवणे हे यामागचे मुख्य कारण असल्याचे रशियाने म्हटले आहे.

रशियामध्ये लवकरच शेतीचा हंगाम सुरू होत आहे. या काळात ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीसाठी इंधनाची मागणी वाढते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी निर्यातीवर मर्यादा आणणे आवश्यक असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. युक्रेनने रशियाच्या अनेक तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोन हल्ले केल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे रशियाला आपल्या नागरिकांसाठी पुरेसा साठा राखून ठेवावा लागत आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना रशियात पेट्रोल महाग होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाने स्पष्ट केले आहे की, युरेशियन इकॉनॉमिक युनियन मधील सदस्य देश (उदा. बेलारूस, कझाकस्तान) आणि ज्या देशांशी रशियाचे विशेष द्विपक्षीय करार आहेत, त्यांना या बंदीतून सूट दिली जाऊ शकते. 

भारतावर काय परिणाम होईल?भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो. जर रशियाने शुद्ध केलेल्या पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घातली, तर जागतिक बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती वाढतील. रशियाने रिफाईन केलेल्या पेट्रोलवर बंदी आणली आहे. युरोप याचा मोठा ग्राहक आहे. भारत रशियाकडून 'पेट्रोल' विकत घेत नाही, तर 'कच्चे तेल'  खरेदी करतो. रशियाच्या या बंदीमध्ये कच्च्या तेलाचा समावेश नाही, त्यामुळे भारताचा पुरवठा खंडित होणार नाही. तसेच भारतावर याचा फार परिणाम होणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia to Halt Petrol Exports: Global Price Hike Expected

Web Summary : Russia bans petrol exports from April 1, 2026, to secure domestic supply amid Ukraine war impacts and rising global prices. Exemptions may apply to Eurasian Union members and countries with bilateral agreements. India could face indirect inflationary pressures due to increased global petrol prices.
टॅग्स :russiaरशियाFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढIranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्ध