शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

14 वर्षांपुर्वी बलात्कार करुन धिंड काढण्यात आलेली 'ती' रॅम्पवर चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 13:29 IST

14 वर्षांपुर्वी सामूहिक बलात्कार करुन नग्न धिंड काढण्यात आलेल्या मुख्तार मई यांनी एका फॅशन शोमध्ये सहभाग घेत रॅम्पवॉक केला आणि जिद्द म्हणजे काय असतं दाखवू दिलं

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 3 - जिद्द म्हणजे काय असते याचा प्रत्यय पाकिस्तानमधील एका फॅशन शोमुळे आला. यावेळी रॅम्पवर मुख्तार मई यांनी रॅम्पवॉक केला. मुख्तार मई या सामान्य महिला नसून जिद्दीच्या जोरावर आपलं आयुष्य त्यांनी पुन्हा सावरलं आहे. 14 वर्षांपुर्वी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, इतकंच नाही तर नग्न धिंडही काढण्यात आली होती. मात्र त्यांनी याविरोधात लढा देत पुन्हा आपल्या आयुष्याला सुरुवात केली. मंगळवारी जेव्हा त्या रॅम्पवर उतरल्या तेव्हा सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं. इतर महिलांनीही आपल्यापासून प्रेरणा घ्यावी असं मुख्तार मई यांना वाटतं. कराचीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. शहरातील अनेक प्रतिष्ठीत लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 
 
महिलांमध्ये धैर्य आणि आशेचा किरण निर्माण व्हावा यासाठी मुख्तार मई प्रयत्न करत आहेत. 'मी जर एक पाऊल उचलत असेन आणि त्यामुळे एका महिलेला जरी प्रेरणा मिळाली तर मला आनंद मिळेल', अशी भावना मुख्तार मई यांनी व्यक्त केली आहे. 
2002 मध्ये पंचायतीने मुख्तार मई यांच्यावर सामूहिक बलात्कार करुन नग्न धिंड काढण्याची शिक्षा सुनावली होती. पण ज्यासाठी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती तो गुन्हा त्यांनी केलाच नव्हता. त्यांच्या भावाने गावातील प्रमुखाच्या कुटुंबातील महिलेशी संबंध ठेवले होते, त्यासाठी मुख्तार मई यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. 
 
पण या घटनेनंतर गावातील इतर महिलांप्रमाणे आत्महत्या करण्याऐवजी मुख्तार मई यांनी लढा द्यायचं ठरवलं. मुख्तार मई सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि दाद मागितली. सामूहिक बलात्कार करणा-या 14 जणांवर खटला दाखल करण्यात आला, यातील सहा जणांना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. मात्र नंतर त्यांची सुटका झाली. 
 
पण यामुळे मुख्तार मई यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. महिलांच्या हक्कांसाठी लढणा-या वकील झाल्या. मीरवाला येथे त्यांनी महिलांसाठी राहण्याची व्यवस्था केली असून मुलींसाठी शाळा बांधली आहे. तुमच्यासोबत एखादी दुर्घटना झाली असेल तर तो आयुष्याचा शेवट नाही असं मुख्तार मई सांगतात.  'माझ्याप्रमाणे दुख: भोगणा-या महिलांचा आवाज मला व्हायचं आहे. आपण दुबळे नाही आहोत, आपल्याकडेही डोकं आणि ह्रदय आहे, आपणही विचार करु शकतो', असं मुख्तार मई बोलल्या आहेत. 'अन्याय होत असेल तर आशा सोडू नका, एक दिवस आपल्याला न्याय नक्की मिळेल,' असंही मुख्तार मई यांनी म्हटलं आहे.