शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 5:44 AM

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवली मध्यस्थीची तयारी

वॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. भारत, पाकिस्तान राजी असल्यास मी काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करेन, असं ट्रम्प म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी अमेरिकेत आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत आणि पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नावर तोडगा काढावा. दोन्ही देशांसाठी फायदेशीर असेल असा मार्ग काढून काश्मीर प्रश्न सोडवण्यात यावा, असं ट्रम्प म्हणाले. प्रत्येक समस्या सोडवली जाऊ शकते. समस्येतून मार्ग निघू शकतो असं म्हणत ट्रम्प यांनी भारत, पाकिस्तान काश्मीर प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यामुळे इम्रान खान यांचा जळफळाट सुरू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं विशेषत: अमेरिकेनं यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी खान यांची मागणी आहे. मात्र काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्यानं तिसऱ्या देशानं यात लक्ष घालू नये, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतली आहे.  काश्मीर प्रश्न अतिशय गंभीर स्वरुप धारण करत असल्याचा दावा खान यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान केला. त्यावेळी पाकिस्तानच्या एका पत्रकारानं ५० दिवस काश्मीरमधील परिस्थिती अतिशय वाईट असल्याचं म्हणत मानवाधिकारांबद्दलचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर ट्रम्प यांनी असे पत्रकार तुम्ही कुठून शोधून आणता, असं म्हणत खान यांना टोला लगावला. खान यांच्या भेटीवेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमातील भाषणाचाही उल्लेख केला. मोदींनी त्या कार्यक्रमात केलेलं विधान अतिशय आक्रमक होतं.  पंतप्रधान मोदी तसं विधान करतील, असं मला वाटलंही नव्हतं. पण तिथे उपस्थित असलेल्या ५९ हजार लोकांनी त्यांच्या विधानाचं स्वागत करत पाठिंबा दर्शवला, असं ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Howdy Modiहाऊडी मोदी