शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी राजपक्षे यांनी केला बंडाचा प्रयत्न !

By admin | Updated: January 12, 2015 00:06 IST

श्रीलंकेचे माजी पराभूत अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी सत्तेला चिकटून राहण्यासाठी निवडणुकीतील पराभवाचा अंदाज येताच लष्कराच्या मदतीने बंड करण्याचा प्रयत्न केला होता,

कोलंबो : श्रीलंकेचे माजी पराभूत अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी सत्तेला चिकटून राहण्यासाठी निवडणुकीतील पराभवाचा अंदाज येताच लष्कराच्या मदतीने बंड करण्याचा प्रयत्न केला होता, असे उघड झाले असून, या घटनेची चौकशी करण्याचे आदेश नव्या सरकारने दिले आहेत. नव्या सरकारकडून सर्वात आधी माजी अध्यक्ष राजपक्षे यांच्या बंडाची, तसेच कटकारस्थानाची चौकशी केली जाईल, असे नवे अध्यक्ष मैत्रीपला सिरीसेना यांच्या सरकारचे प्रवक्ते मंगला समरवीरा यांनी पत्रकारांना सांगितले. लष्कर प्रमुख व पोलीस महानिरीक्षक यांनी राजपक्षे यांना साथ देण्यास नकार दिल्यानंतर राजपक्षे यांनी सत्ता सोडली. राजपाक्षे (६९) यांनी पराभव स्वीकारल्याबद्दल शुक्रवारी त्यांची प्रशंसा होत होती. मतमोजणीची अखेरची फेरी पूर्ण होण्याआधीच त्यांनी पराभव मान्य केला होता. राजपक्षे यांनी मुदत संपण्याआधीच निवडणूक जाहीर केली होती. हे सत्तांतर शांततेने झाले असे लोकांना वाटत आहे; पण सत्य वेगळेच आहे असे समरवीरा यांनी म्हटले. पोलीस महानिरीक्षक इलांगकून यांनी या कटात सहभागी होण्यास नकार दिला. लष्कर प्रमुखांनी पोलिसांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅटर्नी जनरल यांनी या चालीचे घातक परिणाम होतील असा इशारा दिला होता, असे समरवीरा म्हणाले. नवे अध्यक्ष सिरीसेना यांचे मुख्य प्रवक्ते रजिथा सेनारत्ने यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे यांनी पराभवाचा अंदाज येताच लष्कर प्रमुख लेफ्ट. जनरल दया रत्ननायके यांच्यावर सैनिक तैनात करण्यासाठी दबाव आणला; पण त्यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यास नकार दिला. अखेर कोणताही पर्याय न राहिल्याने राजपक्षे यांनी सत्ता सोडली व पराभव मान्य केला. लष्कर प्रमुख, पोलीस महानिरीक्षक व निवडणूक आयुक्त यांनी दाखविलेले धैर्य व ठाम विचार याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा करतो, असे सेनारत्ने यांनी सांगितले. त्यांनी मुक्त व निर्भय निवडणुकीची लोकशाही परंपरा कायम ठेवली, असे सेनारत्ने म्हणाले. राजपक्षे यांचा दावा राजपक्षेंच्या प्रवक्त्याने हा आरोप निराधार असल्याचा दावा केला असून असे काही घडलेच नाही असे म्हटले आहे. ९ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता मतमोजणी चालू असताना अध्यक्ष राजपक्षे यांनी आढावा घेतला व निकाल काय येतील याचा अंदाज घेतला, असे मोहन समरनायके यांनी म्हटल्याचे बीबीसीने म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी सर्व सचिवांना आदेश देऊन सत्तांतराचे आदेश दिले. ज्या राजकीय नेत्याने हे आरोप केले आहेत, त्यांना निराधार आरोप करण्याची सवय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)