पुणे-दुबई विमानसेवेची घोषणा; विमान कंपनीकडून प्रयत्न सुरू, सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 08:55 AM2024-01-13T08:55:35+5:302024-01-13T08:59:05+5:30

पुण्यात आता उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत

Pune Dubai flight service announced Attempts are underway by the airline awaiting government approval | पुणे-दुबई विमानसेवेची घोषणा; विमान कंपनीकडून प्रयत्न सुरू, सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा

पुणे-दुबई विमानसेवेची घोषणा; विमान कंपनीकडून प्रयत्न सुरू, सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुण्यातून दुबईसाठी थेट सेवा सुरू करण्यासाठी विस्तारा विमान कंपनीने प्रयत्न सुरू केले असून, यासंदर्भात सरकारी यंत्रणेच्या परवानगीची आता कंपनीला प्रतीक्षा आहे. आजच्या घडीला पुण्यातून केवळ स्पाईस जेटचे एकच विमान रोज पुणे-दुबई मार्गावर उड्डाण करते. विस्तारा कंपनीला ही परवानगी मिळाल्यास हे दुसरे विमान पुण्यातून थेट दुबईसाठी उड्डाण करू शकेल.

यासंदर्भात कंपनीने परवानगी प्राप्त करण्यासाठी अर्ज केला आहे. पुण्यात आता उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातून दुबई तसेच सिंगापूरसाठी थेट विमान सुरू करावे, अशी तेथील उद्योजकांची मागणी आहे. 

Read in English

Web Title: Pune Dubai flight service announced Attempts are underway by the airline awaiting government approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.