शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

'इम्रान खान, संवादानं समस्या सुटल्या असत्या; तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 3:27 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बोलंदाजीवर राम गोपाल वर्मा यांचा षटकार

मुंबई: काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मागणारे आणि भारताला धमकी देणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी जबरदस्त टोला लगावला. संवादानं प्रश्न सुटतात, असा सूर लावणाऱ्या खान यांना वर्मा यांनी सणसणीत उत्तर दिलं. संवादानं प्रश्न सुटले असते, तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता, असं ट्विट वर्मा यांनी केलं. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये इम्रान खान यांना टॅग केलं आहे. वर्मा यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. राम गोपाल वर्मा यांनी पाच ट्विट करत इम्रान खान यांना लक्ष्य केलं. 'समोरुन एक जण तुमच्या दिशेनं एक गाडी घेऊन येतो. ती आरडीएक्सनं भरलेली असते. त्या व्यक्तीशी आम्ही संवाद कसा साधायचा, हे खान यांनी शिकवावं. खान यांनी याबद्दल मार्गदर्शन केल्यास, आम्ही भारतीय त्यांना गुरुदक्षिणादेखील देऊ', असं म्हणत वर्मा यांनी खान यांना सणसणीत टोला लगावला. दहशतवादी कारवायांचे पुरावे मागणाऱ्या खान यांना वर्मा यांनी दुसऱ्या ट्विटमधून एक प्रश्नदेखील विचारला. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जर तुमच्या देशात ओसामा आहे, हे अमेरिकेला समजतं. पण तुमच्या स्वत:च्या देशाला कळत नाही. तर तुमचा देश खरंच तुमचा आहे?', असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला. पाकिस्तानातील सक्रीय दहशतवादी संघटनांवरुनदेखील वर्मा यांनी खान यांना खोचक शब्दांमध्ये लक्ष्य केलं. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा तुमचे प्ले स्टेशन्स नाहीत, असं मला कोणीच सांगितलं नाही. मात्र तुमचं त्या संघटनांवर प्रेम नाही, असं तुम्ही म्हटल्याचं मी कधीही ऐकलेलं नाही,' असा टोला वर्मा यांनी लगावला. वर्मा यांनी क्रिकेटच्या संज्ञा वापरुनदेखील चौफेर टोलेबाजी केली. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा हे तुमच्याच देशातले चेंडू आहेत, असं मी ऐकलं. हे चेंडू तुम्ही सीमेपार टोलवून भारताच्या पॅव्हेलियनमध्ये पाठवता. क्रिकेटचे चेंडू तुम्हाला बॉम्ब वाटतात का सर? कृपया मार्गदर्शन करा,' असं वर्मा यांनी म्हटलं आहे. 

राम गोपाल वर्मा यांच्या सर्व ट्विट्सची सध्या सोशल मीडियात जबरदस्त चर्चा आहे. वर्मा यांनी त्यांच्या सर्व ट्विटमध्ये खान यांना टॅग केलं आहे. त्यामुळे आता या ट्विट्सना खान यांना काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुलवामातील हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर देशात संतापाची लाट आहे. यानंतर भारतानं पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आहे. भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा केला आहे. याशिवाय अधिक आर्थितक निर्बंध लादण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खानRam Gopal Varmaराम गोपाल वर्माTerror Attackदहशतवादी हल्ला