शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

पंतप्रधानांचा आखाती देशांचा आणि पश्चिम आशियाचा पाचवा दौरा, पॅलेस्टाइन भेटीकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 11:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम जॉर्डनमध्ये जातील. तेथे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (द्वितिय) यांची भेट घेऊन हेलिकॉप्टरने ते रामल्ला येथे जातील. शनिवार सकाळी ते यासर अराफात संग्रहालयाला भेट देतील. १०- ११ फेब्रुवारी या दिवसांमध्ये ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे. १० फेब्रुवारी रोजी ते पॅलेस्टाइन भेटीवर जात असून ते जॉर्डनमार्गे पॅलेस्टाइनमध्ये प्रवेश करतील. पॅलेस्टाइनला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.

 

२०१४ नंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलभेटीनंतर पॅलेस्टाइनला भेट दिली होती. मात्र गेल्या वर्षी इस्रायलला दौऱ्यावर गेले असताना नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाइनला जाणे टाळले होते. त्यामुळे त्य़ांच्यावर भारतातून आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन टीका झाली होती. मात्र आता पॅलेस्टाइनला जाण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे हा तणाव निवळेल अशी अपेक्षा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट केवळ राजकीय नाही तर मानवतावादी दृष्टीकोनातून केलेला दौरा असेल असे मत काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास अशा विविध विषयांवर पॅलेस्टाइनशी करार होण्याची शक्यता आहे. रामल्लामध्ये १०० खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणाही पंतप्रधान करतील अशी शक्यता आहे. तसेच पॅलेस्टाइनमध्ये भारतातर्फे शाळा बांधण्याची घोषणा ते करतील. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या ठरावाला भारताने संयुक्त राष्ट्रात विरोध करुन याआधीच पॅलेस्टाइनबाबत आपली भूमिका कायम असल्याचे सिद्ध केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून भारत आणि इस्रायल यांचे संबंध झपाट्याने वाढत गेले यामुळे पॅलेस्टाइनवासीयांच्या मनामध्ये भारताबाबत साशंकता निर्माण होणे साहजिक होते. मात्र आता पंतप्रधानांच्या पॅलेस्टाइनभेटीमुळे ही साशंकता कमी होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम जॉर्डनमध्ये जातील. तेथे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (द्वितिय) यांची भेट घेऊन हेलिकॉप्टरने ते रामल्ला येथे जातील. शनिवार सकाळी ते यासर अराफात संग्रहालयाला भेट देतील. १०- ११ फेब्रुवारी या दिवसांमध्ये ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील आणि ११-१२ फेब्रुवारी या काळात ते ओमानला जातील. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असताना पहिल्यांदाच ओमानला जात आहेत. ओमानचे सुलतान आणि इतर नेत्यांशी ते विविध विषयांवर चर्चा करतील.

टॅग्स :Palestineपॅलेस्टाइनNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत