पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये दाखल

By Admin | Updated: June 7, 2015 12:40 IST2015-06-06T11:29:03+5:302015-06-07T12:40:46+5:30

दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बांगलादेशची राजधानी ढाका येथे आगमन झाले.

Prime Minister Narendra Modi goes to Bangladesh | पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये दाखल

ऑनलाइन लोकमत

ढाका, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यावर असून थोड्याच वेळापूर्वी त्यांचे राजधानी ढाका येथे पोचले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी वंगबंधू म्युझियम येथे जाऊन शेख मुजीबूर रेहमान यांना आदरांजली वाहिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या दौ-यात उपस्थित आहेत.

या दौ-यादरम्यान दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करणे तसेच त्याची व्याप्ती विस्तृत करणे यावर भर दिला जाणार असून उर्जा, विद्युत आणि संपर्क व जोडणी हे मुद्देही या दौ-याच्या केंद्रस्थानी असतील. तसेच या दोन्ही देशांदरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सूरू असलेल्या सीमावादाचा प्रश्नही निकालात निघेल अशी अपेक्षा आहे.  

या दौ-यात  दोन्ही देशांमध्ये विविध करार होण्याचीही शक्यता आहे. त्यात परस्पर दळणवळण व संपर्क यात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना करणे, दोन्ही देशांतील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढवणे, सांस्कृतिक देवाण-घेवाणीतही आणखी वाढ करणे, कोलकाता-ढाका-आगरतळा बसप्रमाणेच इतर ठिकाणीही बस सुरू करणे अशा अनेक मुद्यांचा समावेश असेल.

 

 

 

 

Web Title: Prime Minister Narendra Modi goes to Bangladesh