शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनच्या संसदेत पंतप्रधानांना धक्काबुक्की

By admin | Updated: December 13, 2015 02:20 IST

युक्रेनचे पंतप्रधान अरसेनी यात्सेनयूक त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे जोरदार समर्थन करीत असताना शुक्रवारी संसदेत एका खासदाराने त्यांना त्यांच्या आसनावरून बाजूला ढकलले.

कीव्ह : युक्रेनचे पंतप्रधान अरसेनी यात्सेनयूक त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे जोरदार समर्थन करीत असताना शुक्रवारी संसदेत एका खासदाराने त्यांना त्यांच्या आसनावरून बाजूला ढकलले. परिणामत: खासदारांमध्ये अक्षरश: हाणामारी झाली.संसदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांच्या गटाच्या एका खासदाराने पंतप्रधानांना त्यांच्या आसनावरून बाजूला ढकलल्याने गोंधळास प्रारंभ झाला. ओलेग बर्ना नावाचा हा खासदार त्यांच्या आसनाजवळ आला आणि त्यांना गुलाबी पुष्पगुच्छ देण्याचे निमित्त करून त्यांना आसनावरून बाजूला ढकलले. ओलेग बर्ना हे पंतप्रधान यात्सेनयूक यांचे कडवे विरोधक मानले जातात. यात्सेनयूक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी मोहीम उघडली आहे.बर्ना यांनी यात्सेनयूक यांना पाठीमागून पकडले आणि ढकलून देण्याचा प्रयत्न केला; पण उंच आणि सडपातळ असलेले पंतप्रधान यात्सेनयूक यांनी स्वत:ला सावरले. याही स्थितीत त्यांना ढकलण्याचा प्रयत्न झाला.ही घटना घडताच पंतप्रधान समर्थक डझनभर खासदारांनी पंतप्रधानांकडे धाव घेतली आणि बर्ना यांना ठोसे लगावले. यावेळी झालेल्या हाणामारीत कोणीही फारसे गंभीर जखमी झाले नाही.युक्रेनच्या संसदेत खासदारांची संख्या ४५० असून तेथे खासदारांत होणारी हाणामारी नित्याचीच बाब आहे. त्यात अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या समर्थक खासदारांत उभी फूट पडली आहे. येथील सरकार रशियाविरोधी आणि पाश्चिमात्य समर्थक आहे. रशियन समर्थक बंडखोरांच्या कारवायांनी गेल्या काही वर्षांत ९ हजार लोक ठार झाले आहेत. त्यातच राजकीय नेत्यांत असे गंभीर मतभेद निर्माण झाले आहेत. (वृत्तसंस्था)संसद ही सर्कस नाही आणि शक्तिप्रदर्शनाचे स्थानही नाही. देशासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.- अरसेनी यात्सेनयूक (पंतप्रधान)