शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 05:41 IST

जगासाठी दिला हाेता  शेवटचा शांततेचा संदेश, धार्मिक, वैचारिक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान केल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणे केवळ अशक्य...

व्हॅटिकन सिटी - रविवारी (२० एप्रिल) जगभरातील कॅथॉलिक आणि कट्टरपंथीय एकत्र ईस्टर साजरा करीत असताना ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी आपला शेवटचा संदेश दिला.

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी दिलेल्या या संदेशात ते म्हणाले होते, ‘धार्मिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान केल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणे शक्य नाही. खऱ्या अर्थाने शस्त्रे नष्ट केल्याशिवाय देखील शांतता प्रस्थापित होणार नाही. प्रत्येकाला आपल्या संरक्षण करण्याचा अधिकार आहे.’ पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८८ वर्षे होते. भारतात २२ ते २४  एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल.

३८ दिवस सुरू हाेते उपचारपोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती व्हॅटिकनचे कॅमेरलेन्गो कार्डिनल केविन फैरेल यांनी डोमुस सांता मार्ता येथे दिली. या ठिकाणी पोप फ्रान्सिस राहात होते.  फ्रान्सिस यांना डबल न्यूमोनिया झाला होता. पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूनंतर सेंट पीटर्समध्ये त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन, त्यांच्यावर अंत्यसंस्कार, नवीन पोपची निवड या गोष्टी पार पडणार आहे.

पोप फ्रान्सिस हे करुणा, नम्रता यांचे प्रतीक म्हणून कोट्यवधी लोकांच्या सदैव स्मरणात राहतील. येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले होते. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान