शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सिडनीत पंतप्रधानांचे अभूतपूर्व स्वागत

By admin | Updated: November 18, 2014 00:30 IST

आॅस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांनी भेटीला आलेल्या आपल्या पंतप्रधानांचे सोमवारी अभूतपूर्व स्वागत केले. कोणताही देश सरकारकडून चालवला जात नाही

सिडनी : आॅस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांनी भेटीला आलेल्या आपल्या पंतप्रधानांचे सोमवारी अभूतपूर्व स्वागत केले. कोणताही देश सरकारकडून चालवला जात नाही, तो चालवला जातो जनतेकडून असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले आणि जमावाने त्याचे स्वागत टाळ्यांच्या कडकडाटात केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांची भेट घेणार असून, यावेळी दोन्ही देशादरम्यान विविध करारावर स्वाक्षरी होईल, बुधवारी पंतप्रधान फिजीला जातील. आॅस्ट्रेलियन पर्यटकांना भारतात आल्यानंतर मिळणारा व्हिसा, तसेच अनिवासी भारतीय नागरिकांसाठी ओसीआय व पीआयओ यांचे दोन महिन्यात विलीनीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. येथील आॅलिम्पिक पार्क येथे मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या २० हजार भारतीय नागरिकांसमोर ते बोलत होते. भारताच्या पंतप्रधानांनी २८ वर्षांनंतर आपल्या नागरिकांशी साधलेला हा पहिला संवाद होता. ‘मोदी, मोदी’ चा जयघोष सिडनीचा आॅलिम्पिक पार्क भारून टाकत होता. या प्रेमामागे अपेक्षा आहेत हे मला माहीत आहे, तुमच्या स्वप्नातला भारत मला निर्माण करायचा आहे, असे मोदी यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. भारताने मागे का राहावे याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. आपण आपल्या खिडक्या उघडू या, ताजी हवा आत येऊ द्या, असे मोदी म्हणाले. भारत सरकारने अनेक अनावश्यक कायदे रद्द केले आहेत, त्याचा हा उल्लेख होता. भारतीय नागरिकांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागतामुळे पंतप्रधान मोदी भारावून गेले होते. हे स्वागत, हा आदर, हा उत्साह मी भारतीय जनतेला अर्पण करतो असे मोदी म्हणाले. केंद्र सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. रेल्वे खात्यात परदेशी गुंतवणुकींची मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत वाढविली आहे, आॅस्ट्रेलियातील कंपन्या रेल्वेसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करतील, अशी अपेक्षा करू असेही ते म्हणाले. स्वच्छ भारत योजनेचा उल्लेख करून देश स्वच्छ असेल तर अधिक पर्यटक येतील, असे मोदी यांनी सांगितले. या योजनेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले आणि ज्या खेड्यातून तुम्ही आला आहात ते गाव दत्तक घ्या, ते गाव सुधारून दाखवा,असेही मोदी म्हणाले. काही लोकांना मोठ्या गोष्टी करायला आवडतात, मला छोटी, छोटी कामे करणे आवडते, म्हणूनच शौचालये बांधणे आणि स्वच्छता करणे अशा घोषणा मी दिल्या, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)