शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

पंतप्रधान इंडोनेशियात दाखल, जोको विडोडो यांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 12:00 PM

पंतप्रधान इंडोनेशियातील उद्योजकांची भेट घेणार असून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांनी त्यांना संध्याकाळी भोजनाचे आमंत्रण दिले आहे.

जाकार्ता- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन देशांचा दौरा कालपासून सुरु झाला आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर असा हा दौरा असणार आहे. इंडोनेशियामध्ये पोहोचल्यावर त्यांचे भारतीय समुदायाने उत्साहात स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे ट्वीटरवरुन आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची मार्डेका पॅलेस येथे भेट घेतली आहे.

संध्याकाळी पंतप्रधान इंडोनेशियातील उद्योजकांची भेट घेणार असून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांनी त्यांना संध्याकाळी भोजनाचे आमंत्रण दिले आहे. तसेच पंतप्रधान इंडोनेशियातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतील. उद्या 31 मे रोजी पंतप्रधान थोड्या वेळासाठी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे जातील आणि मलेशियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान महाथिर मोहंमद यांचे अभिनंदन करतील. त्यानंतर पंतप्रधान सिंगापूरला रवाना होतील. सिंगापूरमध्ये अर्थ, कौशल्यविकास, नगरनियोजन, कृत्रिम बुद्धीमत्ता अशा अनेक विषयांवर त्यांची चर्चा होईल आणि ते काही निवडक उद्योगांच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतील. शुक्रवारी ते राष्ट्रपती हालिमा याकोब यांची भेट घेतील व पंतप्रधान ली सिन लूंग यांच्याशी शिष्टमंडळासह चर्चा करतील. या भेटीनंतर ते नानयांग तंत्रज्ञान विद्यापिठाला भेट देऊन तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. संध्याकाळी शांग्री ला संवाद परिषदेत सहभागी होतील. 1 जून रोजी क्लीफर्ड पियर येथे एका कोनशिलेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. येथे महात्मा गांधींच्या अस्थींचे विसर्जन झाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndonesiaइंडोनेशियाMalaysiaमलेशियाsingaporeसिंगापूरprime ministerपंतप्रधान