‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर आता मादक फोटो नाही

By Admin | Updated: October 14, 2015 01:12 IST2015-10-14T01:12:12+5:302015-10-14T01:12:12+5:30

आपल्या पहिल्याच (१९५३) अंकात अभिनेत्री मर्लिन मन्रोचे मादक छायाचित्र मुखपृष्ठावर छापणारे ‘प्लेबॉय’ मासिक यापुढे मुखपृष्ठावर महिलांची नग्न छायाचित्रे देणार नाही.

Playboy's homepage now has no sexy photos | ‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर आता मादक फोटो नाही

‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर आता मादक फोटो नाही

वॉशिंग्टन : आपल्या पहिल्याच (१९५३) अंकात अभिनेत्री मर्लिन मन्रोचे मादक छायाचित्र मुखपृष्ठावर छापणारे ‘प्लेबॉय’ मासिक यापुढे मुखपृष्ठावर महिलांची नग्न छायाचित्रे देणार नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट फ्लांडर्स यांच्या माहितीनुसार हा निर्णय गेल्या महिन्यात प्लेबॉयचे प्रमुख संपादक कोरी जोन्स यांनी प्लेबॉयचे संस्थापक ह्यूग हॅफनर यांची भेट झाल्यानंतर घेण्यात आला. हा निर्णय मार्च महिन्याच्या अंकापासून अमलात येईल. प्लेबॉयच्या छापील आवृत्तीमध्ये महिलांची उत्तान छायाचित्रे मात्र असतील. फ्लांडर्स यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, आता ही छायाचित्रे नग्न नसतील. इंटरनेटच्या या दिवसांत अशा तऱ्हेची छायाचित्रे ही फार सामान्य बाब झाली आहे. प्लेबॉयचा खप १९७५ मध्ये ५६ लाख प्रती होता. आज तो ८ लाख प्रती आहे.

Web Title: Playboy's homepage now has no sexy photos