रशियाला जाणारे विमान अफगाणिस्तानमध्यो कोसळले; भारत सरकारने दिले स्पष्टीकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 01:37 PM2024-01-21T13:37:53+5:302024-01-21T13:38:30+5:30

विमान अफगाणिस्तानातील तोफखाना पर्वतांमध्ये कोसळले असून, प्रशासनाने एक टीम पाठवली आहे.

Plane Crashed In Afghanistan: plane-flying-to-moscow-crashed-in-the-wakhan-region-of-afghan | रशियाला जाणारे विमान अफगाणिस्तानमध्यो कोसळले; भारत सरकारने दिले स्पष्टीकरण...

रशियाला जाणारे विमान अफगाणिस्तानमध्यो कोसळले; भारत सरकारने दिले स्पष्टीकरण...

Plane Crashed In Afghanistan: अफगाणिस्तानतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात शनिवार, 20 जानेवारीच्या रात्री एक विमान कोसळले आहे. अफगाण मीडियाच्या वृत्तानुसार, वैमानिक दिशा चुकला आणि मूळ मार्गापासून दूर झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. हे भारतीयविमान असल्याची माहिती अफगाण मीडियातून दिली जात होती. 

विमान भारताचे नाही
मात्र, हे विमान भारताचे नसल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, 'अफगाणिस्तानमध्ये नुकताच झालेला दुर्दैवी विमान अपघात भारतीय विमान किंवा नॉन-शेड्युल्ड (NSOP)/चार्टर विमान नाही. हे मोरोक्कन नोंदणीकृत विमान होते.' मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान रशियाची राजधानी मॉस्कोला जात होते.

बदख्शानच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख जबिहुल्ला अमीरी यांनी सांगितले की, प्रवासी विमान बदख्शान प्रांतातील कुरान-मुंजन आणि झेबाक जिल्ह्यांजवळील तोफखाना पर्वतांमध्ये कोसळले. तपासासाठी एक पथक या भागात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी विमान कोसळले. विमानात एकूण 6 प्रवासी होते.

Web Title: Plane Crashed In Afghanistan: plane-flying-to-moscow-crashed-in-the-wakhan-region-of-afghan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.