‘इसिस’कडून मुलांना शिरच्छेदाचे प्रशिक्षण

By Admin | Updated: June 6, 2015 00:17 IST2015-06-06T00:17:15+5:302015-06-06T00:17:15+5:30

इराक व सिरियातील मोठा प्रदेश गिळंकृत करणाऱ्या इसिस वा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आता ८ व ९ वर्षांच्या कोवळ्या मुलांना शिरच्छेदाचे प्रशिक्षण देण्याचे सत्र अवलंबले आहे.

Parental training from 'Isis' to children | ‘इसिस’कडून मुलांना शिरच्छेदाचे प्रशिक्षण

‘इसिस’कडून मुलांना शिरच्छेदाचे प्रशिक्षण

त्रिपोली : इराक व सिरियातील मोठा प्रदेश गिळंकृत करणाऱ्या इसिस वा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आता ८ व ९ वर्षांच्या कोवळ्या मुलांना शिरच्छेदाचे प्रशिक्षण देण्याचे सत्र अवलंबले आहे.
लिबियाच्या डेर्ना शहरात या दहशतवाद्यांनी एका सैनिकाचा शिरच्छेद केला. त्यावेळी जमलेल्या गर्दीत लहान मुलेही होती. या मुलांना पुढे बोलावून मारलेल्या माणसाचे शिर धडापासून कसे वेगळे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या मुलांचे वय आठ वर्षांपर्यंत होते. इसिसच्या टेरर सेलचा जिहादी विलयत बाका याने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. मुलांनाही शिरच्छेद कसा होतो हे कळले पाहिजे, असे बाका याने म्हटले आहे.
डेर्ना शहरावर इसिसने गेल्यावर्षी ताबा मिळवला आहे. लिबिया सरकारच्या सैनिकाला येथील मशिदीसमोर काफीर ठरवून ठार मारण्यात आले. त्याने लिबिया सरकारच्या वतीने इसिसशी लढा दिला होता. अब्दुलनबी शूरगावी, असे त्याचे नाव होते.
शिरच्छेद करताना त्याला नारंगी रंगाचा जम्पसूट घालण्यात आला होता, तर शिरच्छेद करणाऱ्यांनी काळे कपडे घातले होते. शिरच्छेद केल्यानंतर त्याचे डोके हातात धरून मुलांना दाखविण्यात आले. हे दृश्य पाहणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरही भीतीचे भाव नव्हते.(वृत्तसंस्था)

Web Title: Parental training from 'Isis' to children