म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:46 IST2025-10-08T12:46:31+5:302025-10-08T12:46:58+5:30
Myanmar Paraglider Bomb Attack: म्यानमारमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने भीषण हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले.

म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
Myanmar Paraglider Attack: म्यानमारमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने भीषण हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले. निर्वासित राष्ट्रीय एकता सरकारच्या प्रवक्त्याने बीबीसी बर्मीजला ही माहिती दिली. सोमवारी संध्याकाळी चौंग ऊ शहरात ही भयंकर घटना घडली, जिथे बौद्ध परंपरेशी संबंधित असलेल्या थाडिंग्युट उत्सव साजरा करण्यासाठी जवळपास १०० लोक जमले होते. या कार्यक्रमादरम्यान, काही जण सरकारी धोरणांविरुद्ध कँडल मार्चचं नेतृत्व करत असताना राग्लायडरमधून दोन बॉम्ब टाकण्यात आले.
२०२१ मध्ये लष्कराने सत्ता काबीज केल्यापासून म्यानमार गृहयुद्धात अडकला आहे. संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, हिंसाचारात ५,००० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. सोमवारी (६ ऑक्टोबर) पीपल्स डिफेन्स फोर्सेसच्या प्रतिनिधीने बीबीसी बर्मीजला सांगितलं की, ते लोक जमलेले असताना त्यांना हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर आंदोलन लवकर संपवण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु पॅराग्लायडर आधी आलं आणि अवघ्या सात मिनिटांत बॉम्ब टाकण्यात आले.
Myanmar junta airstrike on Thadingyut full moon kills 17 in Sagaing Region
— Burma News International (@bnionline1) October 8, 2025
A junta airstrike on a Thadingyut oil lamp strike in Chaung U Township, Sagaing Region, killed 17 civilians, including women and children, and injured about 40 othershttps://t.co/8bZOkgsSQ1pic.twitter.com/uJTqRZNybG
एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, "पहिला बॉम्ब माझ्या गुडघ्यावर लागला, पण मला माझ्या आजूबाजूला लोकांचा आवाज ऐकू येत होता." स्थानिकांनी सांगितलं की, हल्ल्यानंतर कोणाचा मृत्यू झाला हे ओळखणं कठीण होतं. आंदोलनाचं आयोजन करणाऱ्या एका महिलेने वृत्तसंस्थेला सांगितलं की, "लहान मुलं अत्यंत वाईट पद्धतीने जखमी झाली होती."
विमान आणि हेलिकॉप्टरच्या कमतरतेमुळे लष्कर पॅराग्लायडर हल्ल्यांचा वापर वाढवत असल्याचं म्हटलं जात आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे त्यांना नवीन शस्त्रे आणि विमानं खरेदी करण्यापासूनही रोखलं गेलं आहे. निषेधादरम्यान, लोक लष्कराच्या सक्तीच्या भरती धोरणांचा आणि आगामी निवडणुकांचा निषेध करत होते आणि आंग सान सू की यांच्यासह राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी करत होते.