शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

पॅलेस्टाइनचे राजदूत हाफिज सईदबरोबर एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 1:40 PM

26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदबरोबर पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूत वालिद अबू अली एकाच व्यासपीठावर गेल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भारताने पॅलेस्टाइनच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देभारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांच्या निरोप समारंभासाठीही वालिद अबू अली उपस्थित होते तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचीही त्यांनी भेट घेतली आहे असे इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

नवी दिल्ली-  26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदबरोबर पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूत वालिद अबू अली एकाच व्यासपीठावर गेल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भारताने पॅलेस्टाइनच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रात भारताने पाठिंबा दिलेला नाही. तरिही पॅलेस्टाइनच्या राजदुतांनी असे कृत्य केल्याबद्दल भारताने संताप व्यक्त केला आहे.वालिद अबू अली आणि हाफिज सईदचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी हा मुद्दा भारत पॅलेस्टाइन सरकारकडे मांडेल असे सांगितले. '' या संदर्भातील माहिती आमच्याकडे आली आहे, हा मुद्दा नवी दिल्लीमधील पॅलेस्टाइनच्या राजदुतांकडे आणि पॅलेस्टाइनसरकारसमोर हा मुद्दा आम्ही जोरदारपणे मांडू '' असे रवीश कुमार यांनी सांगितले. वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांनुसार हे फोटो एका रॅलीमधील असून दिफा -ए-पाकिस्तान या संस्थेने आयोजित केली होती. पाकिस्तानातील ही संस्था भारत आणि अमेरिकेविरोधात गरळ ओकण्याचे काम करते. शुक्रवारी रावळपिंडीतील लियाकत बाग येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पॅलेस्टाइनचा राजदूत शेजारी बसलेला असूनही हाफिज सईदने यावेळेस भारत आणि अमेरिकेविरोधात विखारी भाषण केले. या कार्यक्रमात वालिद अबू अली यांनीही भाषण केले तर इतर वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये काश्मीरचा मुद्दा काढला व अमेरिकेविरोधात विधाने केली आहेत.भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांच्या निरोप समारंभासाठीही वालिद अबू अली उपस्थित होते तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचीही त्यांनी भेट घेतली आहे असे इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

टॅग्स :Palestineपॅलेस्टाइनIndiaभारतPakistanपाकिस्तान