शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:49 IST

खरे तर, शनिवारपूर्वी ब्लॅकआउट उठवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानच्या कृतींनंतर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ब्लॅक आउट लागू करण्यात आले.

भारत आणि पाकिस्तान यांच्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर आणि तणावानंतर, शनिवार, १० मे रोजी युद्धविरामावर सहमती झाली. मात्र यानंतर, पाकिस्तानने अवघ्या ४ तासांतच सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले. त्याला भारतानेही प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दोन्ही देशांतील युद्धविरामाची घोषणा केली होती."अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तान यांनी तत्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. या समजदारीबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन! असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून म्हटले होते. यानंतर भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही पत्रकार परिषदेत याची पुष्टी केली. मात्र, याच रात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन दिसल्याचे आणि स्फोट झाल्याचे वृत्त आले. यानंतर, भारतीय लष्कराने हवाई संरक्षण प्रणालींचा वापर करून प्रत्युत्तर दिले आणि रात्री ११ वाजता विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाची माहिती दिली. तसेच भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिल्याचेही सांगितले.

पुन्हा ब्लॅक आउट -खरे तर, शनिवारपूर्वी ब्लॅकआउट उठवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानच्या कृतींनंतर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ब्लॅक आउट लागू करण्यात आले. पंजाबातील ज्या जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला, त्यांत  होशियारपूर, फिरोजपूर, फाजिल्का, पठाणकोट, पटियाला, मोगा, कपूरथला, मुक्तसर यांचा समावेश होता. गुजरातमधील कच्छ, जामनगर, पाटण, संतालपूर आणि बनासकांठा येथे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर राजस्थानातील जोधपूर आणि जैसलमेर येथे वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

जम्मू आणि काश्मीरमध्ये तणाव आणि संघर्षशनिवारी संध्याकाळी नागरोटा लष्करी तळाजवळ एका संशयिताशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला. व्हाईट नाईट कॉर्प्सने या चकमकीची पुष्टी केली आहे. ड्रोन हल्ले आणि स्फोटांमुळे खोऱ्यात तणाव कायम आहे.

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा -या घडामोडींदरम्यान, आपण युद्धविरामाचे प्रामाणिकपणे पालन करण्यास वचनबद्ध आहेत, असे पाकिस्तानने म्हटले होते. याच वेळी पाकिस्तान ने भारतावरच युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही जबाबदारीने आणि संयमाने परिस्थिती हाताळत आहोत, भारतच काही भागात उल्लंघन करत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादOperation Sindoorऑपरेशन सिंदूर