शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यच! महिलेनं एकाचवेळी तब्बल 7 मुलांना दिला जन्म; डॉक्टर अवाक, वडिलांनी दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 16:37 IST

यासंदर्भात बोलताना डॉक्टर म्हणाले, 8 महिन्यांची गर्भवती असलेली एक महिला शनिवारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली होती. त्यावेळी तिच्या गर्भात पाच मुले असल्याचे तपासात समोर आले होते.

पाकिस्तानात (Pakistan) एका महिलेने एकाच वेळी तब्बल सात मुलांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले, अल्ट्रासाउंड आणि इतर रिपोर्टमध्ये, महिलेच्या गर्भात (Pregnant Woman) पाच मुले असल्याचे समजले होते. हे पाहून ते अवाक झाले होते. मात्र डिलिव्हरीनंतर (Baby Delivery) या महिलेने सात मुलांना जन्म दिला. सध्या, सर्व नवजात बालकांची आणि त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे. (Woman gave birth to 7 child at once)

ही घटना खैबर पख्तूनख्वाच्या (Khyber Pakhtunkhwa)  एबोटाबाद (Abbottabad) येथील आहे. येथे यार मोहम्मद यांच्या पत्नीला लेबर पेन होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. जिन्ना इंटरनॅशनल रुग्णालयात यार मोहम्मदच्या पत्नीने या 7 मुलांना जन्म दिला. यात चार मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.

पतीची प्रतिक्रिया -बीबीसीच्या म्हणण्यानुसार, यार मोहम्मद यांनी म्हटले आहे, की या मुलांच्या पालन-पोषणात त्यांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण ते एकत्र कुटुंबात राहतात आणि कुटुंबातील प्रत्येकजण त्यांना मदत करेल. या 7 मुलांशिवाय, यार मोहम्मद यांना दोन मुलीही आहेत. म्हणजेच त्यांच्या कुटुंबात आता एकूण 9 मुले झाले आहेत.

काय म्हणाले डॉक्टर ? -यासंदर्भात बोलताना डॉक्टर म्हणाले, 8 महिन्यांची गर्भवती असलेली एक महिला शनिवारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली होती. त्यावेळी तिच्या गर्भात पाच मुले असल्याचे तपासात समोर आले होते. महिलेचा रक्तदाब खूप वाढलेला होता. तसेच तिचे पोटही मोठ्या प्रमाणावर फुललेले होते. ऑपरेशनचा पर्यायही धोकादायक होता, कारण पूर्वी या महिलेचे दोन ऑपरेशन्स झालेले होते. यामुळे तिचे जुने टाके आणि गर्भाशय फाटण्याचीही भीती होती. मात्र, काही डॉक्टरांच्या टीमने एक तासाहून अधिक वेळ चललेली  डिलिव्हरी यशस्वी केली. संबंधित महिलेला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. पण, सातही मुले आणि त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला