अफगाणिस्तनच्या तालिबानी सैन्याचा पाकिस्तानवर आणखी तीव्र हल्ला; डूरंड लाइनजवळ २ पोस्टवर कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 08:26 IST2026-03-03T08:26:16+5:302026-03-03T08:26:55+5:30

याआधी तालिबानी सैन्याने पूर्व अफगाणी शहर जलालाबाद येथे पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले. त्यातील पायलटला एअरक्राफ्टच्या पॅराशूटमधून उतरल्यानंतर जिवंत पकडण्यात आले.

Pakistan vs Afghanistan War: Afghan Taliban forces launch another fierce attack on Pakistan; capture 2 posts near Durand Line | अफगाणिस्तनच्या तालिबानी सैन्याचा पाकिस्तानवर आणखी तीव्र हल्ला; डूरंड लाइनजवळ २ पोस्टवर कब्जा

अफगाणिस्तनच्या तालिबानी सैन्याचा पाकिस्तानवर आणखी तीव्र हल्ला; डूरंड लाइनजवळ २ पोस्टवर कब्जा

इस्लामाबाद - अफगाणिस्तानातील तालिबानी प्रशासनाने पाकिस्तानला आणखी एक झटका दिला आहे. तालिबानने डूरंड लाइनवरील पाकिस्तानच्या २ पोस्टवर कब्जा केला आहे. इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान सैन्यानं कंधार प्रांतातील स्पिन बोल्डक आणि शोराबक जिल्ह्यातील डूरंड लाइनजवळ पाकिस्तानी सैन्याच्या पोस्टवर कब्जा केल्याचं समोर आले आहे.

तालिबानी सैन्याने रावलपिंडीतील नूर खान एअरबेसवर पाकिस्तानी कमांड आणि कंट्रोल सेंटरला टार्गेट करून ड्रोन हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तालिबानचा हा हल्ला पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या महत्त्वाच्या मिलिट्री तळांपैकी एक आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय सैन्यानेही या एअरबेसवर टार्गेट हल्ला केला होता. मे २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ४ दिवस सैन्य संघर्ष सुरू होता. यात भारताने नूर खान एअरबेसला टार्गेट करून तिथे मोठे नुकसान केले. मागील ९ महिन्यापासून या एअरबेसवर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यात तालिबानच्या हल्ल्यानंतर पुन्हा इथे नुकसान झाले आणि सोबतच दुरुस्तीच्या कामालाही धोका निर्माण झाला. 

अफगाणिस्तानच्या नॅशनल डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अधिकृत X अकाऊंटनुसार, तालिबानी सैन्याने क्वेटामध्ये १२ डिविजन हेडक्वार्टर आणि खैबर पख्तूनख्वामधील पाकिस्तानी सैन्य तळांवर ड्रोन हल्ले केले आहेत. त्याशिवाय एअरफोर्सने पाकिस्तानच्या अत्यावश्यक सैन्य तळांवरही अचूक निशाणा साधत हवाई हल्ला केला. त्यात रावलपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेटामध्ये हेडक्वार्टर, खैबर पख्तूनख्वा येथील मोहम्मद एजेंसीतील ख्वाजाई कॅम्प आणि इतर सैन्य तळे, कमांड सेंटरवर टार्गेट हल्ला करण्यात आला आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, याआधी तालिबानी सैन्याने पूर्व अफगाणी शहर जलालाबाद येथे पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले. त्यातील पायलटला एअरक्राफ्टच्या पॅराशूटमधून उतरल्यानंतर जिवंत पकडण्यात आले. सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. शुक्रवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुल आणि दक्षिण शहर कंधार येथे एअरस्ट्राइक केले होते. जिथे तालिबानी सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादाचे ठिकाण आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात १३३ तालिबानी सैनिक मारले गेले तर २०० हून अधिक जखमी झालेत. अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि काहींवर कब्जा करण्यात आल्याचे पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी दावा केला आहे. 

Web Title : तालिबान का पाकिस्तान पर हमला, डूरंड रेखा के पास पोस्ट पर कब्जा

Web Summary : तालिबान ने डूरंड रेखा के पास पाकिस्तान की दो चौकियों पर कब्जा कर लिया, जिससे तनाव बढ़ गया। हवाई हमले और ड्रोन हमले हुए, जिसमें दोनों देशों के सैन्य ठिकानों को निशाना बनाया गया, जिसमें पाकिस्तान का नूर खान एयरबेस भी शामिल है। दोनों तरफ से हताहतों की खबर है, जिससे संघर्ष बढ़ गया है।

Web Title : Taliban Seizes Pakistan Posts, Escalating Border Conflict Near Durand Line

Web Summary : Taliban forces seized two Pakistani posts near the Durand Line, intensifying tensions. Airstrikes and drone attacks were exchanged, targeting military bases in both countries, including a strike on Pakistan's critical Noor Khan Airbase. Casualties are reported on both sides, escalating the conflict.