पाकिस्तान म्हणतो, लष्करी आघाडीची कल्पनाच नाही

By Admin | Updated: December 17, 2015 01:01 IST2015-12-17T01:01:35+5:302015-12-17T01:01:35+5:30

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सौदी अरेबिया तयार करीत असलेल्या लष्करी आघाडीची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगत पाकिस्तानने मध्य पूर्वेतील राजकारणापासून स्वत:ला

Pakistan says, there is no idea of ​​a military front | पाकिस्तान म्हणतो, लष्करी आघाडीची कल्पनाच नाही

पाकिस्तान म्हणतो, लष्करी आघाडीची कल्पनाच नाही

इस्लामाबाद : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सौदी अरेबिया तयार करीत असलेल्या लष्करी आघाडीची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगत पाकिस्तानने मध्य पूर्वेतील राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार पाकचे परराष्ट्र सचिव अजीज चौधरी यांनी सौदीच्या घोषणेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, आपण ३४ देशांची लष्करी आघाडी स्थापन करीत आहोत ही सौदीची घोषणा अनेक देशांना अचंबित करणारी ठरली. आमच्या सौदीतील राजदूतांना त्यादेशाकडून स्पष्टीकरण घेण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Pakistan says, there is no idea of ​​a military front