पाकिस्तान करार करून फसला...! संरक्षणाला येण्यासाठी सौदीचा दबाव, आखातात इराणविरोधात जावे लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:42 IST2026-03-13T12:41:52+5:302026-03-13T12:42:50+5:30

Pakistan Saudi Defense Pact, Iran War: इराण आणि सौदी अरब यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सौदीला लष्करी पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे मध्य पूर्वेतील युद्धाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर.

Pakistan Saudi Defense Pact, Iran War: Saudi pressure to come to its defense, will it have to go against Iran in the Gulf? | पाकिस्तान करार करून फसला...! संरक्षणाला येण्यासाठी सौदीचा दबाव, आखातात इराणविरोधात जावे लागणार?

पाकिस्तान करार करून फसला...! संरक्षणाला येण्यासाठी सौदीचा दबाव, आखातात इराणविरोधात जावे लागणार?

पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने काही महिन्यांपूर्वी एकमेकांना युद्धात मदत करण्याचा करार केला होता. यामुळे सौदीच्या संरक्षणासाठी पाकिस्तानचे अणुबॉम्ब तयार असतील, अशा आशयाची वक्तव्ये पाकिस्तानी नेत्यांनी केली होती. तसेच सौदी देखील पाकिस्तानच्या मदतीला धावेल, असे पाकिस्तानने म्हणत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानची फुशारकी आता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

मध्य पूर्वेतील आखाती देशांवर इराण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. या देशांकडे पुरेसे सैन्यबळ नाही तसेच हे हल्ले परतवून लावण्याची यंत्रणाही नाही. इराणने सौदीला देखील नामोहरम करून सोडले आहे. यामुळे आता या करारानुसार पाकिस्तानने आपली मदत करावी, सैन्य आणि लष्करी यंत्रणा पाठवावी अशी मागणी सौदी करू लागला आहे. इराणकडून सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकन तळांवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रियाधमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली.

सौदीचा पाकिस्तानवर दबाव?
सौदी अरब इराणविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानने सामील व्हावे यासाठी दबाव टाकत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये 'स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स एग्रीमेंट' झाले होते. या करारानुसार, सौदीवर झालेला हल्ला हा पाकिस्तानवर झालेला हल्ला मानला जाईल. या करारानुसार पाकिस्तानने आता आपली लष्करी ताकद सौदीसाठी वापरावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

पाकिस्तानची कोंडी: इराणचा इशारा
दुसरीकडे, पाकिस्तान या युद्धात पडण्यास कचरत आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी पाकिस्तानला या युद्धापासून लांब राहण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. इराणने म्हटले आहे की, जोपर्यंत अमेरिका आणि इस्रायल इराणच्या हक्कांना मान्यता देत नाहीत, तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. पाकिस्तान सध्या इराण आणि सौदी अरब यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र सौदीच्या लष्करी दबावामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे.

Web Title : पाकिस्तान की मुश्किल: क्या सऊदी अरब ईरान से लड़ने का दबाव डाल रहा है?

Web Summary : सऊदी अरब द्वारा पाकिस्तान पर ईरान के खिलाफ सैन्य सहायता प्रदान करने का दबाव है, जो कि पहले के रक्षा समझौते पर आधारित है। ईरान ने पाकिस्तान को संघर्ष से दूर रहने की चेतावनी दी है, जिससे देश के लिए मुश्किल स्थिति पैदा हो गई है।

Web Title : Pakistan in a Bind: Saudi Pressure to Confront Iran?

Web Summary : Pakistan faces pressure from Saudi Arabia to provide military assistance against Iran, based on a prior defense agreement. Iran warns Pakistan to stay out of the conflict, creating a difficult situation for the country.