किळसवाणे...! पाकिस्तानात 5 जणांचा बकरीवर बलात्कार, नंतर गळा चिरला; इम्रान खान झाले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 18:48 IST2021-07-31T18:46:05+5:302021-07-31T18:48:11+5:30
Pakistan : या घटनेनंतर, लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपला संताप व्यक्त केला आहे. लोक पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना, त्यांनी रेपच्या घटनांवर दिलेल्या एका वक्तव्यावरून ट्रोल करत आहेत.

किळसवाणे...! पाकिस्तानात 5 जणांचा बकरीवर बलात्कार, नंतर गळा चिरला; इम्रान खान झाले ट्रोल
इस्लामाबाद - पाकिस्तानात (Pakistan) एका बकरीवर 5 जणांनी बलात्कार करून तिचा गळा चिरल्याची विकृत आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. पंजाब प्रांतातील ओकारा शहरात हा प्रकार घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. (pakistan punjab province police booked 5 men for allegedly sexually assaulting and killing a goat)
या घटनेनंतर, लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपला संताप व्यक्त केला आहे. लोक पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना, त्यांनी रेपच्या घटनांवर दिलेल्या एका वक्तव्यावरून ट्रोल करत आहेत. इम्रान खान यांनी नुकतेच म्हटले होते, की बलात्काराचे एक कारण छोटे कपडे परिधान करणेही आहे. महिलांचे असे कपडे पुरुषांना आकर्षित करतात.
स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना 24 जुलैची आहे. बकरीच्या मालकाने सांगितले, की त्याने ही बकरी 60 हजार रुपयांत विकत घेतली होती. ज्या दिवसी ही घटना घडली, त्या दिवशी बकरी घराबाहेर बांधलेली होती. याच दरम्यान तिला पाच लोक उचलून घेऊन गेले. काही किलो मिटर अंतरावर ही बकरी मृतावस्थेत सापडली. तिचा गळा चिरलेला होता.
मालकाने दिलेल्या माहितीनुसार, या बकरीला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी केली. बलात्कार करणाऱ्यांतील तीन आरोपींची ओळख पटली आसून नईम, नदीप, रब नवाज अशी त्यांची नावे आहेत. मात्र, दोन आरोपींची ओळख पटलेली नाही, हे सर्व आरोपी सध्या फरार आहेत. पाकिस्तान पिनल कोडच्या कलम 377 आणि 429 नुसार, या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.