पाकिस्तान हादरलं! पेशावरमधील मदरशात मोठा स्फोट; ७ बालकांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी

By कुणाल गवाणकर | Published: October 27, 2020 10:26 AM2020-10-27T10:26:24+5:302020-10-27T10:45:17+5:30

Pakistan Peshawar madrasa blast: पेशावरमधील दिर कॉलनीतील मदरशात स्फोट; अनेकांची प्रकृती गंभीर

Pakistan Five killed 26 injured in blast at Peshawar madrasa | पाकिस्तान हादरलं! पेशावरमधील मदरशात मोठा स्फोट; ७ बालकांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी

पाकिस्तान हादरलं! पेशावरमधील मदरशात मोठा स्फोट; ७ बालकांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी

Next

पेशावर: पाकिस्तानच्या पेशावरमधील एका मदरशाजवळ स्फोट झाला आहे. दिर कॉलनीत असलेल्या मदरशाजवळ झालेल्या स्फोटात ७ बालकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू झालं आहे. जखमी बालकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक बालकांची प्रकृती गंभीर आहे.

पाकिस्तानच्या डॉन न्यूजनं पोलिसांच्या हवाल्यानं दुर्घटनेत ७ बालकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे.




खैबर पख्तुनख्वाचे पोलीस प्रमुख डॉ. सनाउल्लाह अब्बासी आणि एसएसपी मंसूर अमन यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'स्फोटात जखमी झालेल्यांना एलआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू आहे. या स्फोटामागचा नेमका उद्देश अद्यापपर्यंत समजलेला नाही. मदरशात मुलांचा अभ्यास सुरू असताना जोरदार स्फोट झाला,' अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एलआर रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद कासिम यांनी आतापर्यंत रुग्णालयात ७ जणांचे मृतदेह आणि ७० पेक्षा अधिक जखमींना आणण्यात आल्याची माहिती दिली. जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना तातडीनं रूजू होण्यास सांगण्यात आल्याची माहिती कासिम यांनी दिली.

Read in English

Web Title: Pakistan Five killed 26 injured in blast at Peshawar madrasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.