शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
5
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
6
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
7
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
8
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
9
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
10
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
11
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
12
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
13
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
14
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
16
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
17
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
18
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
19
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
20
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी

Pakistan Economic Crisis: श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, का उद्धभवली ही परिस्थिती..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:33 IST

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याची माहिती आहे.

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. यातच राष्ट्रपतींनी देश सोडून पलायन केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. भारताकडून श्रीलंकेला शक्य ती मदत केली जात आहे. दरम्यान, श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सींनी इशारा दिला आहे. एजन्सींकडून पाकिस्तानात आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात लक्षणीय घट झाली असून कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेचे आणखी एक मोठे कारण म्हणजे जगात मंदीच्या सावटामुळे पाकिस्तानच्या कमाईच्या संधीही मर्यादित होत आहेत. सध्या त्यांच्या कमाईतही वाढ होण्याची शक्यता नाही. याशिवाय तेथील परिस्थिती पाहून गुंतवणूकदारही अंतर राखत आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

रेटिंग एजन्सीचा अंदाजफिचकडून 17 देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पाकिस्तान, ट्युनिशिया, घाना, इथिओपिया, ताजिकिस्तान, अर्जेंटिना, बेलारूस इत्यादी देशांचा समावेश आहे. एजन्सीने जारी केलेल्या अहवालात पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे दिवाळखोर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत, परिस्थिती हाताळण्यासाठी पाकिस्तान सरकारने श्रीमंतांवर सुपर टॅक्स लादणे, लक्झरी वस्तूंच्या आयातीवर बंदी घालणे यासारखी पावले उचलली आहेत.

पाकिस्तानातील परिस्थिती का बिघडली?पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा 10 अब्ज डॉलरच्या खाली गेला आहे. देशातील महागाईचा दर 20 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया घसरला असून तो 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे. ज्या देशांशी पाकिस्तानचे व्यापारी संबंध आहेत, तेथे मंदीच्या भीतीने व्यापारात घट झाली आहे.

श्रीलंकेत महागाई दर 50 टक्क्यांवर पोहोचला पाकिस्तानची ही परिस्थिती पाहून असे वाटते की, तेही श्रीलंकेच्या वाटेवर जात आहेत. श्रीलंकेतही या परिस्थितीची सुरुवात परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यापासून झाली. यानंतर रेटिंग एजन्सींनी तेथील रेटिंग कमी केले. त्यामुळे श्रीलंकेतील गुंतवणुकीवर परिणाम झाला. एवढेच नाही तर सहज कर्ज मिळणे बंद झाले. सध्या श्रीलंकेचा महागाईचा दर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था