पाकची पुन्हा आगळीक

By Admin | Updated: June 2, 2015 00:38 IST2015-06-02T00:38:37+5:302015-06-02T00:38:37+5:30

पाकिस्तानी सुरक्षा दलाने सोमवारी जम्मू जिल्ह्यातील सीमेलगतच्या पूंछ जिल्ह्यात आघाडीच्या चौकीवर तीनदा गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले

Pakistan again aggravated | पाकची पुन्हा आगळीक

पाकची पुन्हा आगळीक

जम्मू : पाकिस्तानी सुरक्षा दलाने सोमवारी जम्मू जिल्ह्यातील सीमेलगतच्या पूंछ जिल्ह्यात आघाडीच्या चौकीवर तीनदा गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला.
बीएसएफच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कुठलीही चिथावणी नसताना पाकिस्तानी सैनिकांनी हीरानगर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात सकाळी ११.१५च्या दरम्यान गोळीबार केला. या गोळीबारात दलाचा ए. के. राभा नावाचा जवान जखमी झाला. बीएसएफनेही लगेच प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे ही चकमक चालली.
अतिरेक्यांनी पुन्हा एकदा काश्मिरातील दूरसंचार सेवांना लक्ष्य करीत श्रीनगर येथे सोमवारी एका मोबाईल टॉवरवर ग्रेनेड डागले. या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली.

Web Title: Pakistan again aggravated