युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 22:54 IST2025-07-02T22:53:43+5:302025-07-02T22:54:31+5:30
तत्पूर्वी, पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भारत गेल्या अनेक वर्षांपूसन करत होता. मात्र पाकिस्तान त्याकडे दुर्लक्ष करत होता...

युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
भारताविरोधात युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचे भिरभिरे आता जमिनीवर आले आहे. बिलावल भुट्टो यांनी बुधवारी (2 जुलै 2025) भारताकडेदहशतवाद विरोधातील लढाईत सहभागी होण्याची विनंती केली आहे. तत्पूर्वी, पाकिस्ताननेदहशतवादाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भारत गेल्या अनेक वर्षांपूसन करत होता. मात्र पाकिस्तान त्याकडे दुर्लक्ष करत होता.
भारत-पाकिस्तान एक-मेकांचे विरोधक नाहीत -
दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आम्ही भारतासोबत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व भागीदारी करण्यास तयार आहोत. भारत-पाकिस्तान हे एकमेकांचे विरोधक नाहीत, असे बिलावल यांनी म्हटले आहे. ते इस्लामाबाद पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये आयोजित एक आंतरराष्ट्रीय सम्मेलनात बोलत होते.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो म्हणाले, भारत आणि पाकिस्तानने शेजारी म्हणून राहायला हवे आणि दहशतवाद्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पुढे यायला हवे. याचवेळी, सिंधू पाणी करारासंदर्भात बोलताना ते म्हणाले, भारताने पाण्याला शस्त्र बनवू नये आणि हिमालयाप्रमाणे मजबूत शांततेचा पाया रचायला हवा.
दरम्यान भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, बिलावल भुट्टो यांनी अनेक वेळा भारताविरोधात "विषाक्त" गरळ ओकली होती. मात्र, आता ते सर्व प्रलंबित वादांच्या निराकरणासाठी भारतासमोर हात जोडत आहेत.