शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:20 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. शिवाय, केंद्र सरकारनेही या घटनेस जबाबदार असलेल्या पाकिस्तानविरोधात विविध कारवाया सुरू केल्या आहेत. या सर्व कारवायांमुळे पाकिस्तानी सैन्यात प्रचंड घबराट पसरली आहे. यामुळेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आपल्या कुटुंबाला खासगी विमानाने परदेशात पाठवले आहे.

पाक सैन्य घाबरलेपहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 48 तासांच्या आत भारताने युद्धनौका आयएनएस सूरतवरुन क्षेपणास्त्र चाचणी केली. यामुळे अरबी समुद्रात पाकिस्तानी नेव्हीला कडक संदेश मिळाला. याशिवाय, केंद्राने हवाई दल आणि सैन्याला तयार कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळेच पाकिस्तानी सैन्यात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी लष्करप्रमुखांसह पाकिस्तानच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खाजगी विमानाने ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवले आहे.

पाकिस्तानवर मोठी कारवाईपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. भारतातील सर्व राजकीय पक्षही या मुद्द्यावर केंद्र सरकारसोबत आहेत. पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत केंद्र सरकारने शेजारील देशासोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला. याशिवाय, अटारी-वाघा सीमेवरुन होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना 48 तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत