प्लेबॉयमधून महिलांची नग्न छायाचित्र बाद

By Admin | Updated: October 13, 2015 12:22 IST2015-10-13T12:22:14+5:302015-10-13T12:22:23+5:30

हॉट आणि बोल्ड छायाचित्रांसाठी पुरुषांमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्लेबॉय मासिकामध्ये आता महिलांची नग्न छायाचित्र छापणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nude photo of women from playboy later | प्लेबॉयमधून महिलांची नग्न छायाचित्र बाद

प्लेबॉयमधून महिलांची नग्न छायाचित्र बाद

ऑनलाइन लोकमत 
न्यूयॉर्क, दि. १३ - हॉट आणि बोल्ड छायाचित्रांसाठी पुरुषांमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्लेबॉय मासिकामध्ये आता महिलांची नग्न छायाचित्र छापणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन्सच्या काळात सध्या प्रत्येकाला एका क्लिकवर सेक्ससंबंधींचे छायाचित्र उपलब्ध झाल्याने प्लेबॉयने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. 
अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्लेबॉयचे सीईओ स्कॉट फ्लँडर्स आणि प्लेबॉयचे संस्थापक ह्यू हेफनर यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत प्लेबॉय मासिकात महिलांची नग्न छायाचित्र छापणे बंद करण्यास हेफनर यांनी होकार दिला आहे.  सध्या प्रत्येक किशोरवयीन मुलगा इंटरनेटशी जोडलेला आहे आणि इंटरनेटवर पॉर्न  अगदी सहज बघायला मिळते. त्यामुळे हा निर्णय घेण्याची गरज होती असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र यापुढेही महिलांची कामूक छायाचित्र छापले जातील असा निर्णय प्लेबॉयच्या वरिष्ठ अधिका-यांनी घेतला आहे. प्लेबॉयचे सीईओ स्कॉट फ्लँडर्स यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
१९५३ मध्ये अमेरिकेत प्लेबॉय या मासिकाची सुरुवात झाली. ख्यातनाम अभिनेत्री व मॉडेल्सची नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्र प्लेबॉयच्या कव्हर पेजवर झळकायची. त्यामुळे अवघा काही महिन्यांमध्येच प्लेबॉयला फक्त अमेरिकाच नव्हे तर जगभरातील पुरुष वाचकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. 

 

Web Title: Nude photo of women from playboy later