शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:16 IST

Donald Trump News: यावर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी जगभरातील अनेक संघर्षांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिका आता आणखी एका ठिकाणी युद्धाची आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

यावर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी जगभरातील अनेक संघर्षांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिका आता आणखी एका ठिकाणी युद्धाची आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना उघड धमकी देताना राष्ट्रपती म्हणून मोजकेच दिवस उरले आहेत, असा इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, निकोलस माडुरो यांचं सरकार हे अमेरिकेमध्ये ड्रग्स आणि गुन्हेगारीसाठी एक माध्यम बनले आहे. एवढंच नाही तर हे सरकार व्हेनेझुएलामधील लोकांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थलांतरासाठीही  जबाबदार आहे.एकीकडे अमेरिकेने कॅरेबिनय देशांमध्ये आपल्या सर्वात मोठ्या लष्करी तळाच्या आधुनिकीकरणाचं काम ३५ वर्षांनंतर हाती घेतलं असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, ते आमच्यासोबत खूप वाईट वर्तन करत आहेत. केवळ ड्रग्स प्रकरणातच नाही तर त्यांनी आमच्या देशामध्ये आम्हाला नको असलेल्या लाखो लोकांना पाठवलं आहे. त्यांनी त्यांच्या देशातील तुरुंग आमच्या देशात रिकामे केले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्याकडील मानसोपचार केंद्रं आणि वेड्यांच्या रुग्णालयेही आमच्या अमेरिकेत आणून रिकामी केली आहेत.

दरम्यान, सध्या अमेरिकन सैन्यदले कॅरेबियन बेटांवर असलेल्या आपल्या नौदल तळाचं आधुनिकीकरण करत आहे. तसेच तिथे सातत्याने लष्करी मोहिमांची तयारीही सुरू आहे. यामधून अमेरिका व्हेनेझुएलामध्ये संभाव्य सैनिकी कारवाई करू शकते, असे संकेत मिळत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump threatens Venezuela's Maduro: 'Your days are numbered'

Web Summary : Trump warns Venezuela's President Maduro, accusing his government of drug trafficking and mass migration. America modernizes Caribbean military base, hinting at potential military action.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय