आता गाझात ग्राउंड अ‍ॅटॅक, आपल्या नागरिकांना बंदुका वाटतोय इस्रायल; अमेरिकेनंही दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 01:23 PM2023-10-28T13:23:58+5:302023-10-28T13:27:24+5:30

युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत...

Now Ground Attack in Gaza, Israel Feels Guns on Its Citizens; America also responded | आता गाझात ग्राउंड अ‍ॅटॅक, आपल्या नागरिकांना बंदुका वाटतोय इस्रायल; अमेरिकेनंही दिली प्रतिक्रिया

आता गाझात ग्राउंड अ‍ॅटॅक, आपल्या नागरिकांना बंदुका वाटतोय इस्रायल; अमेरिकेनंही दिली प्रतिक्रिया

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 21 दिवसांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत जवळपास 9 हजार लोक मारले गेले आहेत. हे युद्ध आता आणखी रौद्र रूप धारण करण्याची चिन्ह आहेत. आता इस्रायलने आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार करायला सुरुवात केली आहे. इस्रायल त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देणार आहे. इस्रायलचे पोलीसमंत्री इतामार बेन ग्विर यांनी इस्रायलच्या दक्षिणेकडील अश्कलोनमधील नागरिकांना शस्त्रास्त्रे वाटली आहेत. तसेच, युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी इस्रायली सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.

यातच, युद्धाची भयानक वेळ आली असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत, लिंडा थॉमस ग्रीनफील्ड म्हणाल्या, आपण भयंकर क्षणी भेटत आहोत, हा क्षण इस्रायली आणि पॅलेस्टिनींसाठी भयंकर आहे. हा क्षण संपूर्ण जगासाठीच अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या डोळ्यांदेख होणारे मृत्यू आणि विनाश आणि निराशेचा हा खेळ माणुसकीवरील विश्वास उडवण्यासाठी पुरेसा आहे.

6 ऑक्टोबरच्या यथास्थितीत जाणे अशक्य -
लिंडा थॉमस ग्रीनफील्ड म्हणाल्या, राष्ट्रपती बायडेन यांनी म्हटल्याप्रमाणे, 6 ऑक्टोबरच्या स्थितीत जाणे अशक्य आहे.  आपण तसे करू नये. हमास इस्रायलमध्ये दहशत निर्माण करतो आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांना ढाल म्हणून वापरत आहे. आपण त्या स्थितीतही जाऊ नये, जेथे जहशतवादी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींवर हल्ला करू शकतात आणि दहशत माजवू शकतात. यथास्थिती अस्थिर असून ती स्वीकार करण्यासारखी नाही. अर्थात, हे संकट जेव्हा संपुष्टात येईल. तेव्हा पुढे काय असेल? यासंदर्भात दृष्टीकोण असायला हवा. हा दृष्टिकोण टू स्टेट सोल्यूशन भोवती फिरणारा असेल.

Web Title: Now Ground Attack in Gaza, Israel Feels Guns on Its Citizens; America also responded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.