आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:56 IST2026-04-03T11:55:24+5:302026-04-03T11:56:49+5:30
मांतुरोव यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन ऊर्जा आणि खते यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली.

आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धाने संपूर्ण जग इंधन टंचाइचा सामना करताना दिसत आहे. यातच आता, भारताचा जुना मित्र असलेला रशिया मदतीसाठी सरसावला आहे. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव यांनी गुरुवारी भारताला तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मांतुरोव यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन ऊर्जा आणि खते यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. 'एक्स'वर पोस्ट करत ते म्हणाले, "रशियाच्या उपपंतप्रधानांसोबत व्यापार, खते, कनेक्टिव्हिटी आणि लोकांमधील सहकार्य आदी विविध विषयांवर चर्चा झाली. गेल्या डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेल्या भारत-रशिया शिखर परिषदेच्या निष्कर्षांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देशांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. मंतुरोव्ह आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली.
भारताची गरज पूर्ण करण्यासाठी रशिया तयार -
यासंदर्भात रशियन दूतावासाने निवेदन जारी करत म्हटले आहे, "मांतुरोव यांनी पुष्टी केली आहे की, रशियन कंपन्या भारताला तेल आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) चा पुरवठा सातत्याने वाढवण्यास सक्षम आहेत. २०२५ च्या अखेरीस रशियाने भारताला लागणाऱ्या खनिज खतांच्या पुरवठ्यात ४० टक्क्यांनी वाढ केली असून, भविष्यातील गरजा पूर्ण करण्याची तयारीही दर्शवली आहे.
Я был рад встретиться с первым заместителем председателя правительства России Денисом Мантуровым. Мы обсудили наше взаимовыгодное сотрудничество в сферах торговли, поставок удобрений, связей между людьми наших стран и взаимосвязанности. Я приветствую последовательные усилия,… pic.twitter.com/3qCrQ6kXoX
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2026
होर्मुजच्या नाकेबंदीवर उपाय -
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाला आहे. भारत साधारणपणे आपली ९० टक्के ऊर्जा गरज याच मार्गावरून पूर्ण करतो. मात्र, हा मार्ग बंद झाल्याने अनेक जहाजे अडकून पडली आहेत. यावर उपाय म्हणून भारताने रशिया, व्हेनेझुएला यांसारख्या देशांकडून तेल खरेदी वाढवली आहे.