फक्त गलवानवरच नाही चीनचा डोळा; ...तर तब्बल 250 बेटांवर ड्रॅगन करेल कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 07:09 PM2020-07-05T19:09:05+5:302020-07-05T19:19:34+5:30

दक्षिण चीन सागरात जवळपास, 250 बेटं आहेत. या सर्व बेटांवर कब्जा करण्याचा चीनचा मनसुबा आहे. जगाचा एक तृतियांश म्हणजे, तब्बल तीन ट्रिलियन डॉलरचा व्यापार याच समुद्र मार्गाने चालतो.

Not only galwan chinas plan to intrusion 250 ice lands in south china sea | फक्त गलवानवरच नाही चीनचा डोळा; ...तर तब्बल 250 बेटांवर ड्रॅगन करेल कब्जा

फक्त गलवानवरच नाही चीनचा डोळा; ...तर तब्बल 250 बेटांवर ड्रॅगन करेल कब्जा

Next
ठळक मुद्देदक्षिण चीन सागरात जवळपास, 250 बेटं आहेत. जगाचा एक तृतियांश म्हणजे, तब्बल तीन ट्रिलियन डॉलरचा व्यापार याच समुद्र मार्गाने चालतो.याच मुद्द्यावर जपान आणि व्हिऐतनामही चीनचा सातत्याने विरोध करत आले आहेत.

नवी दिल्ली -भारत-चीनदरम्यान लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवरील (एलएसी) तणाव प्रचंड वाढला आहे. याचदरम्यान दक्षिण चीन सागरातही चिनी नौदलाच्या युद्धाभ्यासाचे काही फोटो समोर आले आहेत. ग्लोबल टाइम्सने 1 जुलैपासून सुरू असलेल्या युद्धाभ्यासाचे फोटो जारी करत, 'चीनच्या दक्षिण, उत्तर आणि पूर्व थिएटर कमांड्सने दक्षिण चीन सागर, पिवळा सागर आणि पूर्व चीन सागरात आपल्या नौदलाचे कौशल्य दाखवले,' असे लिहिले आहे.

ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या युद्धाभ्यासात 054 ए फ्रिगेट्स आणि 052 डी गायडेड मिसाइल्स डिस्ट्रॉयर्सचा वापर करण्यात आला. भारतासोबत सुरू असलेल्या तणावात चीनमधून येणाऱ्या अशा फोटोंना शक्ती दाखवण्याचा ड्रॅगनचा एक उपक्रम असल्याचे मानले जात आहे. मात्र, संरक्षण तज्ज्ञ, हा चीनच्या विस्तारवादी नीतीचा नमूना असल्याचे म्हणत आहेत. तज्ज्ञांच्या मते चीनचा डोळा केवळ गलवानवरच नाही, तर दक्षिण चीन सागरातील बेटांवरही आहे. 

दक्षिण चीन सागरात जवळपास, 250 बेटं आहेत. या सर्व बेटांवर कब्जा करण्याचा चीनचा मनसुबा आहे. जगाचा एक तृतियांश म्हणजे, तब्बल तीन ट्रिलियन डॉलरचा व्यापार याच समुद्र मार्गाने चालतो. या बेटांवर कब्जा करून येथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर नजर ठेवता यावी, त्यांना रोखता आणि टोकता यावे, अशी चीनची मनीषा आहे. संरक्षण तज्ज्ञ एसपी सिन्हा यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले, की चीनला आताच रोखावे लागेल. त्याला आता रोखले गेले नाही, तर तो कोरोनातून बाहेर पडताच या सर्व बेटांवर कब्जा करू शकतो.

संरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे, की जमिनीवरील विस्तारवादाचा अंदाज घेतल्यानतंर, आता चीन समुद्रातही याच भूमिकेचा अवलंब करत आहे. तो सातत्याने दक्षिण चीन सागरावर आपला दावा सांगत आहे. अंतरराष्ट्रीय न्यायालयातही चीनला याच मुद्द्यावर तोंडावर अपटावे लागले आहे. याच मुद्द्यावर जपान आणि व्हिऐतनामही चीनचा सातत्याने विरोध करत आले आहेत. हा भाग मुक्त राहणे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

चीन सीमेवर तणाव वाढतोय, पंतप्रधान मोदींनी घेतली राष्‍ट्रपतींची भेट; अर्धातास चालली चर्चा

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

Web Title: Not only galwan chinas plan to intrusion 250 ice lands in south china sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.