शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग पुन्हा गायब, अफवांना उधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:18 PM

किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. यावेळी त्यांनी, कोरियातील वर्कर्स पार्टीच्या 7व्या केंद्रीय समितीच्या 13 व्या पॉलिटिकल ब्यूरोच्या बैठकीत भाग घेतला होता.

ठळक मुद्देउत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन तीन महिन्यांत तिसऱ्यांदा गायबकिम जोंग सर्वप्रथम 20 दिवस गायब झाले होते.किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते.

प्योंगयांग -उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन सातत्याने काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही आठवड्यांपूर्वीही ते गायब झाल्याने चर्चेत आले होते. एवढेच नाही, तर काहींनी ते गंभीर आजारी असल्याचा आणि काहींनी त्यांचा मृत्यू झाल्याचा कयासही लावला होता. यानंतर ते अचानकपणे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी हजर झाले. तेव्हा कुठे या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. मात्र, आता किम जोंग पुन्हा गायब झाल्याने अफवांना उधान आले आहे. ते तब्बल तीन आठवड्यांपासून गायब आहेत. 

तीन महिन्यांत तिसऱ्यांदा गायब -किम जोंग हे गेल्या तीन महिन्यांपासून सात्याने गायब होत आहे. 36 वर्षीय किम हे सर्वप्रथम 20 दिवस गायब झाले होते. तेव्हा, त्यांच्या हृदयावरील शस्त्रक्रियेदरम्यान काही गुंतागुंत निर्माण झाली आणि ते गंभीर आजारी पडले अथवा त्यांचा मृत्यू झाला असावा, अशा चर्चाना उधान आले होते. मात्र, 1 मेरोजी ते अचानकच प्रकट झाले आणि त्यांनी एका खतनिर्मिती कारखान्याचे उद्घाटन केले होते. यानंतर कीम पुन्हा तीन आठवडे गायब झाले होते. ते पुन्हा 24 मेरोजी प्रकट झाले. मात्र आता ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा गायब झाले आहेत. यामुळे पुन्हा त्यांच्या मृत्यूसंदर्भात अफवा उठायला सुरुवात झाली आहे. गायब होण्यापूर्वी त्यांनी देशाच्या अण्वस्त्र सज्जतेसंदर्भात भाष्य केले होते. काही तज्ज्ञांनी तर, सरकारी माध्यमे किम यांच्या जागी बनावट व्यक्ती दाखवत आहेत, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

कोरिया द्विपकल्पात सात्यानेत तणाव वाढत आहे. यामुळे किम जोंग यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी जनतेला केले आहे. किम यांनी उत्तर कोरियाची धुरा हाती घेऊन चार वर्षेपूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या वर्षी येथे ज्याप्रमाणे जल्लोष करण्यात आला होतो, तसा यावर्षी पाहायला मिळाला नाही.

किम हे गेल्या तीन महिन्यांत आता सर्वाधिक काळ गायब झाले आहेत. गेल्या आठवड्यांतच जपानच्या एका मंत्र्याने कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणऊन किम जोंग हे सार्वजनिक जीवनापासून दूर असल्याचे म्हटले होते.

किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी दिसले -किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. यावेळी त्यांनी, कोरियातील वर्कर्स पार्टीच्या 7व्या केंद्रीय समितीच्या 13 व्या पॉलिटिकल ब्यूरोच्या बैठकीत भाग घेतला होता. सध्या देशाचा कारभार त्याची बहीण आणि उत्तराधिकारी समजल्या जाणाऱ्या किम यो जोंग पाहत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाला सैन्य कारवाईची धमकीही दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या -

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाDeathमृत्यू