शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ना मोदी, ना ट्रम्प, ना पुतीन... इम्रान खान यांच्या शपथविधीला एकही राष्ट्रप्रमुख नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 4:08 PM

11 ऑगस्टला होणार इम्रान खान यांचा शपथविधी

इस्लामाबाद : इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला कोणत्याही परदेशी नेत्यांना आमंत्रण करण्यात येणार नसल्याचं त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ यांच्या पक्षाला नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान यांचा शपथविधी 11 ऑगस्टला संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रण दिलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र इम्रान खान यांच्या खास मित्रांशिवाय इतर कोणत्याही परदेशी नेत्यांना आमंत्रण दिलं जाणार नसल्याचं पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. ऐवान-ए-सद्रमध्ये (राष्ट्रपती निवासस्थान) 11 ऑगस्टला इम्रान खान पंतप्रधान पदाची शपथ घेतील. 'या कार्यक्रमाला कोणत्याही परदेशी नेत्याला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूर्णपणे राष्ट्रीय कार्यक्रम असेल. या सोहळ्याला इम्रान खान यांचे खास मित्र उपस्थित असतील,' असं चौधरी म्हणाले. या सोहळ्यासाठी खान यांच्याकडून भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपिल देव, नवजोत सिंग सिद्धू आणि अभिनेता आमीर खानला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. मात्र सिद्धू यांच्या अपवाद वगळता यातील कोणीही खान यांच्या निमंत्रणाविषयी जाहीर भाष्य केलेलं नाही. पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेले नवजोत सिंह सिद्धू यांनी इम्रान खान यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. इम्रान खान चारित्र्यसंपन्न व्यक्ती असून लोकांना एकत्र आणण्याची क्षमता इम्रान त्यांच्याकडे आहे, अशी स्तुतीसुमनं सिद्धू यांनी उधळली आहेत. खेळाडू लोकांना एकत्र आणतात. भौगोलिक सीमांची बंधनं मोडून माणसांना एकत्र आणण्याचं कौशल्य खेळाडूंकडे असतं, अशा शब्दांमध्ये सिद्धू यांनी इम्रान खान यांचं कौतुक केलं.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प