Nepal Helicopter Crash धक्कादायक! नेपाळमध्ये मोठी दुर्घटना, नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 18:34 IST2024-08-07T17:38:32+5:302024-08-07T18:34:15+5:30
Nepal Helicopter Crash: हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्तात समोर आले आहे.

Nepal Helicopter Crash धक्कादायक! नेपाळमध्ये मोठी दुर्घटना, नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू
Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी येथे हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर एअर डायनेस्टीचे आहे. हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताबाबत पोलीस अधिकारी शांती राज कोईराला यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर शिवपुरी-७ जवळ कोसळले आहे. हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्तात समोर आले आहे.
या दुर्घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकही मोठ्या संख्येने दाखल झाले. पोलिसांनी सांगितले की, एअर डायनेस्टीचे हे हेलिकॉप्टर रसुवाच्या स्याफ्रुबेसी येथे गेले होते. अपघातानंतर हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी आग लागली. बचावकार्य सुरू आहे. उड्डाणानंतर अवघ्या 3 मिनिटांतच हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण ५ जण होते. या अपघाताबाबत त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळानेही निवेदन जारी केले आहे. कॅप्टन अरुण मल्ला हे हेलिकॉप्टर उडवत असल्याचे सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी त्रिभुवन विमानतळाच्या पूर्व भागात सौरी एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर हा अपघात झाला. या अपघाताचे कारण विमान धावपट्टीवर घसरल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विमान जमिनीवर आदळले आणि आग लागली. याआधी १९९२ मध्ये याच विमानतळावर मोठा अपघात झाला होता, ज्यामध्ये १६७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.