शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नवाझ शरीफ मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार

By admin | Updated: May 24, 2014 15:34 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन टीम

इस्लामाबाद, दि. २४ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीमध्ये २६ मे रोजी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून शरीफ यांनाही निमंत्रण धाडण्यात आले होते. भारत व पाकिस्तानचे कटू संबंध आणि हिंदुत्ववादी भाजपाबद्दल पाकिस्तानात असलेले संशयाचे वातावरण व इस्लामी मूलतत्ववाद्यांचा असलेला विरोध लक्षात घेता शरीफ यांच्या प्रतिसादाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर झालेला दहशतवादी हल्लाही मोदीविरोधासाठी करण्यात आल्याचे मानले जात आहे. 

या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी घेतलेल्या भूमिकेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघितले जात आहे. मोदी यांनी भारताच्या सगळ्या शेजा-यांना या सोहळ्यासाठी बोलावले असून आपण सहकार्यासाठी तयार असल्याचे सूचित केले होते. शरीफ यांनीही सहकार्यासाठी एक पाऊल टाकल्याचा संकेत दिला आहे. शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेला भारताशी व्यापार वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मोदी हे देखील आंतरराष्ट्रीय व्यापारी सहकार्याची भूमिका घेणारे असल्याने व्यापाराच्या माध्यमातून भारत पाक संबंध सुधारतात का याकडे सगळ्यांचे लक्ष असून ही एक सुरुवात असू शकते.

शरीफ यांच्या प्रतिनिधी मंडळामध्ये सल्लागार सरताझ अझिझ, विशेष सहाय्यक तारीक फतेमी व परराष्ट्र सचिव इझाझ चौधरी यांचा समावेश आहे. मोदींचा २६ मे रोजी शपथविधी झाल्यानंतर २७ मे रोजी मोदी व शरीफ यांच्यात बैठक होणार असल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाच्या आमंत्रणाबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मनिष तिवारी म्हणाले की, दहशतवाद व बोलणी एकाचवेळी होऊ शकत नाही असं वारंवार म्हणणारी भाजपा नंतर कसा प्रतिसाद देते हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या कामकाजाबाबत व तिथं लपलेल्या दहशतवाद्यांसंदर्भात पाकिस्तानच्या दिरंगाईबाबत भाजपा काय मत व्यक्त करते हे बघणं महत्त्वाचं आहे.

तर राजीव शुक्ला यांनी शिवसेनेचे खासदार नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेताना दिसतील अशी खिल्ली उडवणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.