इराणमध्ये निसर्गाचा हाहाकार! इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये पडला 'काळा पाऊस'; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 09:44 IST2026-03-09T09:42:39+5:302026-03-09T09:44:13+5:30

Black Rain in Iran: इस्रायलने इराणच्या तेल रिफायनरींवर केलेल्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये काळा विषारी पाऊस पडला आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, या पर्यावरणीय संकटामुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर.

Nature's havoc in Iran! 'Black rain' falls in Tehran after Israeli attack; Normal life disrupted | इराणमध्ये निसर्गाचा हाहाकार! इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये पडला 'काळा पाऊस'; जनजीवन विस्कळीत

इराणमध्ये निसर्गाचा हाहाकार! इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये पडला 'काळा पाऊस'; जनजीवन विस्कळीत

तेहरान: इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता केवळ क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचे भयंकर पर्यावरणीय परिणाम समोर येऊ लागले आहेत. इस्रायलने इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर, इराणची राजधानी तेहरानमध्ये 'काळा विषारी पाऊस' पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रदूषणामुळे शहरात आरोग्य आणि पर्यावरण आणीबाणी निर्माण झाली आहे.

इस्रायली हल्ल्यात इराणचे मोठे तेल साठे आणि रिफायनरी जळून खाक झाल्या. या आगीतून निर्माण झालेला प्रचंड काळा धूर, राख आणि घातक रसायने आकाशात ढगांमध्ये मिसळली गेली. रविवारी जेव्हा तेहरानमध्ये पाऊस झाला, तेव्हा हा पाऊस काळ्या रंगाचा आणि चिकट स्वरूपाचा होता. यात मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन्स आणि विषारी कण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्यावर गंभीर परिणाम
या विषारी पावसामुळे तेहरानमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे विकार जडणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि शेतीचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युद्धाचा पर्यावरणाला तडाखा
युद्धामुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर निसर्गाचाही मोठा ऱ्हास होत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. तेहरानमधील हा काळा पाऊस म्हणजे जागतिक पर्यावरणासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Web Title : इजरायली हमले के बाद ईरान में 'काला पानी', जनजीवन अस्त-व्यस्त

Web Summary : ईरान में कथित इजरायली हमले के बाद तेहरान में 'काला पानी' बरसा, जिससे पर्यावरण और स्वास्थ्य आपातकाल की स्थिति पैदा हो गई। बारिश में हाइड्रोकार्बन और जहरीले तत्व थे, जिससे निवासियों के स्वास्थ्य और जल स्रोतों को खतरा है। यह घटना युद्ध के विनाशकारी पर्यावरणीय प्रभाव को दर्शाती है।

Web Title : Iran Hit by 'Black Rain' After Alleged Israeli Attack

Web Summary : Following an alleged Israeli strike on Iranian oil facilities, Tehran experienced 'black rain,' causing environmental and health emergencies. The rain contained hydrocarbons and toxins, posing risks to residents' health and water sources. The incident highlights the devastating environmental impact of conflict.