शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वमग्न मुलाच्या हत्येसाठी आईला १८ वर्षे शिक्षा

By admin | Updated: May 30, 2015 02:03 IST

न्यू यॉर्कमध्ये सोशलाईट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लक्षाधीश महिलेस आठ वर्षांच्या स्वमग्न (आॅटिस्टिक) मुलाला मारल्याच्या आरोपावरून १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

न्यू यॉर्क : न्यू यॉर्कमध्ये सोशलाईट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लक्षाधीश महिलेस आठ वर्षांच्या स्वमग्न (आॅटिस्टिक) मुलाला मारल्याच्या आरोपावरून १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. २०१० साली मॅनहटन येथील एका आलिशान हॉटेलमध्ये तिने या मुलाची औषधाचा ओव्हर डोस देऊन हत्या केली होती. स्वमग्न मुलांसाठी जगभरात वेगळ्या शिक्षणापासून संगोपनापर्यंत अनेक प्रयोग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या निकालास महत्त्व आहे. गिगी जॉर्डन या ५४वर्षीय मातेने ज्युड मीरा या पोटच्या मुलाची निर्मम हत्या केली. औषधाच्या कुटलेल्या गोळ्या सिरिंजने टोचून मुलाला ठार मारल्याची कबुली तिने दिली होती. जॉर्डनच्या वकिलाने न्यायालयात असा दावा केला की, मुलाचे वडील मुलाचा लैंगिक छळ करीत असल्याने तिने त्याला ठार मारले. मॅनहटनच्या सुप्रीम कोर्टात हा खटला चालला. न्या. चार्ल्स सालोमन यांनी जॉर्डनला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावताना असे नमूद केले की, या महिलेने जे कृत्य केले त्याबद्दल तिला पश्चात्ताप होत असल्याचे दिसले नाही, त्याचे मला नवल वाटते.आपल्याला आपल्या मुलाला वाचवता येणार नाही अशी भीती जॉर्डनला वाटत होती. फिर्यादी पक्षाच्या वकिलांच्या मते जॉर्डनने पद्धतशीरपणे आपल्या मुलाचा खून केला. त्याला घेऊन ती देशभर हिंडली. त्याच्यावर उपचार होतात काय? हे पाहिले; पण उपचार होत नाहीत असे दिसल्यानंतर तिला अपंग मूल स्वीकारणे अशक्य झाले व तिने त्याला मारून टाकले.