शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

...म्हणून ISI ला भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच हवेत; माजी अध्यक्षांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 11:58 AM

या पुस्तकामध्ये काश्मीर समस्या, कारगिल युद्ध, ओसामा बिन लादेनचा मृत्यू, कुलभूषण जाधव यांची अटक, हाफिज सईद, बुरहान वाणी अशा विविध मुद्द्यांवर लेखन करण्यात आले आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानात सध्या एका पुस्तकाने चांगलीच खळबळ माजली आहे. वेगवेगळे दावे करणाऱ्या या पुस्तकावर संपूर्ण पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांचया नेतृत्त्वाखाली आजच चार वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे यातील माहितीवर अधिकच चर्चा केली जात आहे. आयएसआयचे माजी डीजी असद दुरानी आणि रॉचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी भारत व पाकिस्तान यांच्या संबंधांवर स्पाय क्रॉनिकल हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्याचा आयएसआयला आनंद झाला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहिल्यास ते काहितरी मोठा निर्णय घेऊन खळबळ उडेल व त्याचा फायदा आपल्याला होईल अशी त्यांची धारणा होती. नरेंद्र मोदी या पदावरती राहिल्यास त्यांच्या निर्णयामुळे भारताच्या सेक्युलर प्रतिमेला धक्का पोहोचेल आणि त्याचा वैश्विक पातळीवर पाकिस्तानला फायदा होईल असे आयएसआयचे मत होते असे दुरानी यांनी या पुस्तकात मत मांडले आहे.

या पुस्तकामध्ये काश्मीर समस्या, कारगिल युद्ध, ओसामा बिन लादेनचा मृत्यू, कुलभूषण जाधव यांची अटक, हाफिज सईद, बुरहान वाणी अशा विविध मुद्द्यांवर लेखन करण्यात आले आहे. दुरानी यांनी 1998 साली भारतात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आल्यावरही एक लेखन लिहिला होता. त्यामध्ये भारतात भाजपाचे सरकार आल्यामुळे पाकिस्तानने नाराज होण्याची गरज नाही असे म्हटले होते. दुरानी यांच्या पुस्तकावर पाकिस्तानात मोठी नाराजी पसरली आहे. ले. ज. असद दुरानी (निवृत्त) असद दुरानी यांना पाकिस्तानच्या लष्कर मुख्यालयात 28 मे 2018 रोजी बोलावण्यात आले आहे असे पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मे. ज. आसिफ गफूर यांनी ट्वीट केले आहे.

टॅग्स :ISIआयएसआयPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत