शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

या प्रश्नांची उत्तरं देऊन भारतीय फायनलिस्ट ठरल्या विश्वसुंदरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 12:16 PM

प्रश्न-उत्तरांच्या या शेवटच्या फेरीत स्पर्धकांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या बुध्दीमत्तेची आणि समयसूचकतेची परीक्षा होणार असते.

ठळक मुद्देप्रियंका चोप्रानंतर मानुषी छिल्लरने भारतासाठी विश्वसुंदरीचा मुकूट जिंकून आणला. सन २००० नंतर २०१७ मध्ये भारतीयांचं नाव आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत सर्वोच्च उंचीवर गेलं.वेगवेगळ्या पायऱ्या आणि कसोट्या पार करत त्यांनी हा किताब जिंकून आणलाय.

मुंबई : गेल्या आठवड्यात मिस वर्ल्डचा किताब मिळवून मानुषी छिल्लरने आपल्या भारतीयांची मान पुन्हा एकदा ताठ केली. तब्बल १७ वर्षांनी भारतात हा जल्लोष साजरा करण्याचं भाग्य भारतीयांच्या पदरी पडलं. मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत पोहोचेपर्यंत अनेक कठीण मार्ग पार पाडावे लागतात. पण मिस वर्ल्डचा किताब अशाच सुंदरीच्या डोक्यावर चढवला जातो जी त्या शेवटच्या प्रश्नाचं सगळ्यात आकर्षक आणि समर्पक उत्तर देते. त्यामुळे त्या शेवटच्या क्षणी विचारलेल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर सुचणं आणि ते आत्मविश्वासाने संपूर्ण जगासमोर सांगणं हे काही सोपं काम नाही. हा सोहळा काही मर्यादित लोकांच्या उपस्थितीत नसतो. अख्खं जग आपल्याला या वेळी पाहत असतं. अख्ख्या जगासमोर समयसुचकता दाखवून प्रश्नाचं योग्य उत्तर देणाऱ्या सुंदरीलाच्या डोक्यावरच विश्वसुंदरीचा मुकुट चढतो. आज आपण पाहुया की, आजवर भारतातल्या विश्वसुंदरीनी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत हा मुकुट आपल्याकडे खेचून घेतला. 

मानुषी छिल्लर, २०१७

प्रश्न- कोणत्या प्रोफेशनमध्ये जास्त पगार दिला गेला पाहिजे?

उत्तर - माझ्यामते आईला सर्वाधिक मान मिळायला हवा. आईची किंमत पैशांमध्ये करण्यापेक्षा तिला खूप सन्मान आणि प्रेम द्यायला हवं. माझ्या आयुष्यात माझ्या आईचा मोलाचा वाटा आहे. माझी आईच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे मला वाटतं की आईपेक्षा श्रेष्ठ असं प्रोफेशनच या जगात नाही. जगातील प्रत्येकाने आपल्या आईलाच  मान-सन्मान द्यावा.

आणखी वाचा - 'मिस इंडिया' मानुषी छिल्लरने जिंकला 'मिस वर्ल्ड 2017' चा किताब, 17 वर्षांनी भारताला मिळाला बहुमान

प्रियंका चोप्रा, २०००

प्रश्न- मिस वर्ल्ड मिळणं हे तुझ्यासाठी स्टेपिंग स्टोन वाटतं का?

उत्तर- मला जे काही करायचं आहे त्यासाठी मिस वर्ल्डचा किताब मिळणं हे नक्कीच स्टेपिंग स्टोन (महत्त्वाचा किताब किंवा महत्वाची पायरी) असेल. मला माझ्या विचाराने लोकांची मने वळवायची आहेत. मिस वर्ल्ड हे असं व्यासपीठ आहे जिथून मला संपूर्ण जगाशी संवाद साधायची संधी मिळेल. त्यामुळे माझ्या पुढच्या सगळ्याच कार्यासाठी मिस वर्ल्डचा किताब नक्कीच मोलाचा ठरणार आहे.

आणखी वाचा - मानुषी छिल्लरसारखी फिगर हवीये? -हे वाचा

युक्ता मुखी, १९९९

प्रश्न - एक मुलगी म्हणून तू आपल्या आईवडिलांना काय सल्ला देशील?

उत्तर - मी माझ्या आईवडिलांना ए‌वढंच सांगू इच्छिते की आपण आपल्यातलं नातं इतकं दृढ करूया की आपल्याकडे पाहून लोकांनी सुखी कुटुंबाचं उदाहरण द्यायला हवं. तुम्ही मला जे काही शिकवलं आहे, त्या सगळ्या गोष्टी मी कायम लक्षात ठेवेन. 

आणखी वाचा - मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली हे नोटाबंदीचे यश, उद्धव ठाकरेंचा टोला

डायना हेडन, १९९७

प्रश्न- जर जगात तू कोणीही असू शकतेस, तर तुला कोण असावं असं वाटेल?

उत्तर- मला ऑर्डे हेपबर्न (ब्रिटिश अभिनेत्री) व्हायला आवडेल. ती केवळ चेहऱ्याने सुंदर नाहीए तर तिच्या आतील सौंदर्यही प्रत्येकाला आकर्षित करत असते. तिच्यातील करुणा, शांत भाव हे सगळे गुणविशेष आकर्षित करणारे आहेत. त्यामुळे मला ऑर्डे हेपबर्न व्हायला आवडेल.

आणखी वाचा - 'चिल्लर'मधला 'चिल' विसरू नका, शशी थरूर यांच्या ट्विटला मानुषी छिल्लरचे प्रत्युत्तर

ऐश्वर्या राय, १९९४

प्रश्न- १९९४ च्या मिस वर्ल्डमध्ये काय वैशिष्ट्यं पाहिजेत?

उत्तर- मिस वर्ल्डमध्ये करुणा पाहिजे. ही करुणा एका विशिष्ट वर्गासाठी नसावी. जगातील प्रत्येक महिलेला तिच्या करुणेतून उर्मी मिळाली पाहिजे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या मिस वर्ल्डमध्ये हा दयाभाव होता, त्यामुळे १९९४च्या मिस वर्ल्डकडेही हे स्वभाववैशिष्ट्यं हवं असं मला वाटतं.

आणखी वाचा -  ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब जिंकणा-या मानुषी छिल्लरबद्दल काही खास गोष्टी...!

रेइता फारिया, १९६६

प्रश्न- तुला डॉक्टर का व्हावसं वाटतंय?

उत्तर- सध्या सगळीकडेच स्त्रियांच्या आरोग्यकडे दुर्लक्ष दिलं जातं. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत याकरता स्त्रीरोग तज्ज्ञांची गरज आहे. भारतातही स्त्रीरोग तज्ज्ञ आणि  प्रसुतीतज्ज्ञांचीही गरज आहे. त्यामुळे मला डॉक्टर  होऊन स्त्रियांच्या आरोग्यविषयी जनजागृती करायची आहे. 

टॅग्स :Miss Worldविश्वसुंदरीInternationalआंतरराष्ट्रीयAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनPriyanka Chopraप्रियांका चोप्रा