मानुषी छिल्लरसारखी फिगर हवीये? -हे वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:03 PM2017-11-22T17:03:29+5:302017-11-22T17:05:39+5:30

मानुषीची फिटनेस गुरु आणि पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल सांगतेय, मानुषीच्या फिट सौंदर्याचं रहस्य

Miss World Manushi Chhillar's wonder diet! read this | मानुषी छिल्लरसारखी फिगर हवीये? -हे वाचा

मानुषी छिल्लरसारखी फिगर हवीये? -हे वाचा

Next
ठळक मुद्दे सुंदर दिसावं असं वाटणं गैर नाही, पण रोज किमान 30 मिनिटं तरी आपण व्यायाम करतो का?

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सारखी फिगर फक्त 15 दिवसांत कमवता येईल? -असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही? म्हणाल कसं शक्य आहे. पण मानुषीची आहार आणि पोषण तज्ज्ञ नमामी अग्रवाल हिनेच हे सिक्रेट शेअर केलं आहे. नमामी सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट आहेच पण मानुषीची फिटनेस गुरुही आहे. ती सांगतेय फिट आणि सुंदर दिसण्याचे, सतेज चेहर्‍याचे आणि उत्तम फिगरचे सिक्रेट. वाचायला तसे सोपे आहे हे सिक्रेट, पण करायला? अर्थात करायलाही सोपेच आहे, आपण केलं तर? मग मानुषीसारखी फिगर हवी असेल तर हे ट्राय करुन पहा.

 

1) नाश्ता चुकवू नका
नाश्ता न करणं, चुकवणं म्हणजे भूक वाढवणं, तो चुकवायचा नाही.


2) लहान डिशमध्ये थोडं थोडं खा
थोडय़ा थोडय़ा वेळानं, थोडंसं, लहानशा ताटलीत घेऊन खा. थोडं थोडं खाल्लयानं भूक चाळवत नाही आणि मग चमचमीत, गोड खाण्याची इच्छा कमी होते.


3)स्नॅक  किती खाता?
जेवणात मारे सारं पौष्टिक घ्यायचं पण स्नॅक , मधल्या वेळेत मात्र जंक फूड खाण्यात काही हाशक्षल नाही. त्यापेक्षा फळं, सुकामेवा, पॉपकॉन, चिकी खाणं उत्तम.


4) साखर टाळा
साखर अजिबात खाऊ नका. त्यापेक्षा गूळ, खजूर, मध खा. ते उत्तम.

5) टेस्टी पण हेल्दी खा
तेलकट खाऊ नका. त्यापेक्षा उकडलेलं, ग्रिल्ड केलेलं खा. कोल्डड्रिंक अजिबात पिऊ नये. त्यापेक्षा ज्यूस प्या.


6) लवकर जेवा
लवकर निजे, लवकर उठे ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. पण लवकर झोपायचं तर लवकर उठायला हवं. त्यासाठी लवकर जेवायला हवं. रोज संध्याकाळी 7.30 वाजताच जेवा.


7) भरपूर पाणी प्या
भरपूर पाणी पिणं, किमान दिवसाला 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे.


8) कमीत कमी 8 तास झोप
कमीत कमी 8 तास झोप आवश्यक आहेच.  झोप कमी झाली तरी थकवा येतो, चिडचिड होते. झोपण्यापूर्वी 2 तास सगळे स्क्रिन बंद करुन टाका. चाला, गप्पा मारा, पुस्तक वाचा.


9) चालत राहा
कमीत कमी अडीच ते तीस तास व्यायाम आठवडाभरातून झाला तरी उत्तम. तेवढं करा.  म्हणजे दिवसाला फक्त 30 मिनिटं व्यायाम करायचा आहे.

Web Title: Miss World Manushi Chhillar's wonder diet! read this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.