समुद्री जीवांचा लष्करी वापर! इराणचे 'सुसाइड डॉल्फिन' शत्रूचा थरकाप उडवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 06:58 IST2026-05-07T06:57:13+5:302026-05-07T06:58:41+5:30

दोन्ही बाजूंकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला जात असताना इराण मात्र आता ‘शस्त्र’ म्हणून चक्क डॉल्फिन माशांचा अमेरिकेविरुद्ध वापर करणार असल्याचे वृत्त आहे.

Military use of marine life! Iran's 'suicide dolphin' will terrify the enemy | समुद्री जीवांचा लष्करी वापर! इराणचे 'सुसाइड डॉल्फिन' शत्रूचा थरकाप उडवणार

समुद्री जीवांचा लष्करी वापर! इराणचे 'सुसाइड डॉल्फिन' शत्रूचा थरकाप उडवणार

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध रोज नव्या वळणावर पोहोचतंय. अर्थातच या युद्धात केवळ हे देशच नव्हे, तर अख्खं जगच पोळलं जातंय. दोन्ही बाजूंकडून रोज नवनवे दावे केले जात आहेत आणि एक-दुसऱ्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

दोन्ही बाजूंकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला जात असताना इराण मात्र आता ‘शस्त्र’ म्हणून चक्क डॉल्फिन माशांचा अमेरिकेविरुद्ध वापर करणार असल्याचे वृत्त आहे. आता डॉल्फिन आणि युद्ध, घातक शस्त्रं यांचा काय संबंध..? पण, इराण याच डॉल्फिन माशांचा ‘सुसाइड बॉम्बर’सारखा उपयोग करणार असून, होर्मुझ सामुद्रधुनीत तैनात असणाऱ्या अमेरिकी युद्धनौकांना लक्ष्य करणार असल्याचा अहवाल समोर आला आहे.

या अहवालानुसार डॉल्फिन माशांच्या अंगावर घातक शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं लादली जातील. हे डॉल्फिन अमेरिकन युद्धनौकांवर जाऊन धडकतील आणि ती नष्ट केली जातील, अशी रणनीती आहे. ही रणनीती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अमेरिकेनं लादलेल्या नौदल निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था अतिशय अडचणीत आली आहे.

अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून घालवून देण्यासाठी इराणनं ही योजना आखल्याचं म्हटलं जातंय. ही योजना शीतयुद्धाच्या काळाशी संबंधित तंत्रज्ञानावर आधारित असू शकते. अहवालानुसार इराणनं यापूर्वी सोव्हिएत रशियाकडून प्रशिक्षित डॉल्फिन मिळवले होते, ज्यांना सागरी मोहिमांसाठी तयार केलं गेलं होतं. या डॉल्फिन्सना युद्धाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हे डॉल्फिन्स इराणचे नौसैनिक म्हणून अमेरिकन सैन्यावर हल्ला करतील.

जहाजांऐवजी या डॉल्फिनचा वापर समुद्रात स्फोटकं वाहून नेऊन शत्रूच्या जहाजांच्या जवळ पोहोचविण्यासाठी केला जाऊ शकतो. जाणकारांच्या मते ही एक अत्यंत धोकादायक रणनीती ठरू शकते, जी पारंपरिक युद्धपद्धतींना आव्हान देईल.

इराणच्या या रणनीतीमुळे सारेच चक्रावले आहेत. इराणनं जर खरंच असं काही केलं किंवा डॉल्फिन सुसाइड बॉम्बर्सचा वापर केला तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं, याचा विचार अमेरिका करीत आहे. अमेरिकन नौदलानं इराणच्या बंदरांवर कडक नजर ठेवून नाकेबंदी केली आहे, ज्यामुळे तेलाची निर्यात प्रभावित झाली आहे. इराणमधील कठोर भूमिका घेणारे गट या नाकेबंदीला युद्धासारखं पाऊल मानत आहेत. अशा परिस्थितीत समुद्राच्या आत लपून हल्ला करणाऱ्या रणनीतींची चर्चा वाढली आहे, ज्यामध्ये स्फोटकं आणि पाणबुड्यांचा वापर केला जातो.

इराणच्या अशा प्रकारच्या योजनेबाबत अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. तज्ज्ञांनी यातील व्यवहार्यता आणि नैतिक पैलूंवर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः लष्करी उद्देशांसाठी सागरी जिवांचा वापर करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. होर्मुज सामुद्रधुनीसारख्या अत्यंत संवेदनशील जलमार्गात अशा हालचालींमुळे जागतिक व्यापार आणि तेलपुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अमेरिकाही या धोक्याला तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर काम करीत आहे. यामुळे या परिसरातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title : ईरान के 'आत्मघाती डॉल्फिन' अमेरिकी नौसेना को निशाना बनाएंगे: सैन्य खतरा?

Web Summary : रिपोर्टों के अनुसार, ईरान होर्मुज जलडमरूमध्य में अमेरिकी युद्धपोतों के खिलाफ 'आत्मघाती हमलावर' डॉल्फ़िन का उपयोग करने की योजना बना रहा है। विस्फोटकों से लैस, ये डॉल्फ़िन अमेरिकी जहाजों को निशाना बनाएंगी, जो शीत युद्ध के युग की तकनीक पर आधारित एक रणनीति है। इससे नैतिक चिंताएं बढ़ सकती हैं और तनाव बढ़ सकता है।

Web Title : Iran's 'Suicide Dolphins' to Target US Navy: A Military Threat?

Web Summary : Iran reportedly plans to use 'suicide bomber' dolphins against US warships in the Strait of Hormuz. Equipped with explosives, these dolphins would target American vessels, a strategy based on Cold War-era technology. This raises ethical concerns and could escalate tensions.