इसिसचा अर्थप्रमुख सालेहचा खात्मा

By Admin | Updated: December 11, 2015 23:30 IST2015-12-11T23:30:58+5:302015-12-11T23:30:58+5:30

इसिसचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा अबू सालेह गेल्या महिन्यात संयुक्त दलाच्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. अमेरिकन सैन्य दलाचे प्रवक्ते स्टीव्ह वॉरेन यांनी बगदाद

The meaning of this is the end of the Salah | इसिसचा अर्थप्रमुख सालेहचा खात्मा

इसिसचा अर्थप्रमुख सालेहचा खात्मा

वॉशिंग्टन : इसिसचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा अबू सालेह गेल्या महिन्यात संयुक्त दलाच्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. अमेरिकन सैन्य दलाचे प्रवक्ते स्टीव्ह वॉरेन यांनी बगदाद येथे या माहितीला दुजोरा दिला. सालेह हा संघटनेच्या आर्थिक बाबी हाताळणारा ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होता. गेल्या महिन्यात हवाई दलाने त्याच्यासह त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना ठार केले.
अमेरिकेच्या इसिसविरोधी कारवाईचे राजदूत ब्रेट मॅग्रुक यांनी टिष्ट्वट करून इसिसचा आर्थिक पाया उखडून टाकण्यासाठी त्याला लक्ष्य केल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: The meaning of this is the end of the Salah