Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:02 IST2025-10-03T13:01:45+5:302025-10-03T13:02:06+5:30
अमेरिकेच्या सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक असलेल्या शेवरॉनच्या एल सेगुंडो रिफायनरीला भीषण आग लागली.

Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक असलेल्या शेवरॉनच्या एल सेगुंडो रिफायनरीला भीषण आग लागली. आगीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आग इतकी भीषण होती की, आगीचे लोट आणि धुराचं साम्राज्य संपूर्ण परिसरात पाहायला मिळालं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
A huge explosion hit Chevron’s El Segundo refinery near #LosAngeles International #Airport, sparking a massive fire visible for miles.#USpic.twitter.com/i29jZuaOkz
— Cityintel (@Cityintel1) October 3, 2025
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, लॉस एंजेलिस काउंटी सुपरवायझर हॉली मिशेल यांनी सांगितलं की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आग रिफायनरीच्या फक्त एकाच भागात मर्यादित होती, ज्यामुळे मोठं नुकसान टाळता आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याची पुष्टी स्थानिक अधिकाऱ्यानेही केली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
भारतातही रिफायनरीला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीला भीषण आग लागली होती. स्टोरेज टँकमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनी मथुरा रिफायनरीला आग लागली. या वर्षी जानेवारीमध्ये चीनमधील सिनोपेक झेनहाई रिफायनरीला आग लागली होती.